नवी दिल्ली : टेक ब्रँड ने भारतात आपल्या दोन स्मार्ट टीव्हींच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने आणि च्या किंमतीत जवळपास २ हजार रुपयांनी वाढ केली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये लाँच झालेल्या Realme Smart TV SLED 4K ची किंमत ४२,९९९ रुपये होती. यात २ हजार रुपयांनी वाढ होऊन आता किंमत ४४,९९९ रुपये झाली आहे. तसेच, ४३ इंच Realme Smart TV 4K ला गेल्याच महिन्यात लाँच केले होते. याच्या किंमतीत १ हजार रुपयांनी वाढ झाली असून, टीव्ही कंपनीच्या साइटवर २८,९९९ रुपयात उपलब्ध आहे. Realme Smart TV SLED 4K चे स्पेसिफिकेशन्स हा ५५ इंच ४के सिनेमॅटिक SLED डिस्प्लेसोबत येतो. याचा स्क्रिन-टू-बॉडी रेशियो ९४.६ टक्के आणि तर १०८ टक्क्यांपर्यंत एनटीएससी कलर रेंज दर्शवतो. यामध्ये क्रोम बूस्ट पिक्चर इंजिन फीचर देण्यात आले आहे व स्टँडर्ड, स्पोर्ट, गेम, विविड, एनर्जी आणि इतर काही असे सात डिस्प्ले मोड्स मिळतात. वाचा : Realme Smart TV SLED 4K हा मीडियाटेक क्वाडकोर प्रोसेसर सोबत येतो व यात १६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. यात Google Assistant सपोर्ट देखील मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी तीन एचडीएमआय पोर्ट्स, दोन यूएसबी पोर्ट्स, एक एव्ही आउट, एक इथरनेट पोर्ट आणि हेडफोन जॅक मिळेल. Realme Smart TV 4K चे स्पेसिफिकेशन्स Realme Smart TV 4K हा ६४-बिट मीडियाटेक क्वाड-कोर प्रोसेसरसोबत येतो. एलईडी स्क्रीनसोबत येणाऱ्या या टीव्हीत बेझल्स देण्यात आले नाही. स्मार्ट टीव्ही TÜV Rheinland लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसोबत येतो. रियलमीचा हा स्मार्ट टीव्ही अँड्राइड १०.० व्हर्जनवर काम करतो व यात Prime Video, Netflix, YouTube आणि Google Play सपोर्ट मिळेल. यात डॉल्बी एटमॉस ऑडिओ सपोर्टसह २४ वॉट क्वाड स्पीकर्स दिले आहेत. यामध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/365pgx9