नवी दिल्लीः टेक्नोलॉजी मध्ये जसे जसे बदल होत गेले तसे तसे त्याचे आव्हान सुद्धा वाढले आहे. अनेक सायबर घटना उघडकीस येत आहेत. एप्रिल मध्ये लिंक्डइनच्या प्लॅटफॉर्मवरुन ही माहिती समोर आली आहे. आता ९ अशा ९ अँड्रॉयड अॅप्शची माहिती समोर आली आहे की, जी फेसबुक युजरच्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड चोरी करू शकते. ही माहिती Doctor Web च्या रिपोर्टवरून मिळाली आहे. वाचाः डॉक्टर वेबच्या तज्ज्ञांनुसार, हे ९ वायरसचे मोबाइल अॅप खूपच धोकादायक आहेत. या अॅप्सला आतापर्यंत 5,856,010 वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हे अॅप असे आहे. ज्यात मॅकेनिज्मचा वापर करण्यात आला आहे. याचा वापर सेटिंग्सच्या परवानगी नंतर वैध फेसबुक वेब पेज https://ift.tt/2UiSTbY ला वेबव्ह्यू मध्ये अपलोड करते. यानंतर अॅप जावा अॅप स्क्रीप्ट द्वारे फेसबुक युजरची लॉग-आयडी आणि पासवर्ड चोरी केले जाते. परंतु, आता या मोबाइल अॅपला गुगल प्ले स्टोरवरून हटवले आहे. वाचाः Processing Photo या मोबाइल अॅपला गुगल प्ले स्टोरवरुन 5,000,000 हून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. या मोबाइल अॅपला chikumburahamilton ने बनवले आहे. PIP Photo हे एक फोटो एडिटिंग अॅप आहे. या अॅपला Lillians ने तयार केले आहे. गुगल प्ले स्टोरवरून आतापर्यंत 1,000,000 हून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. Horoscope Daily 1,000,000 हून अधिक युजर्संनी या अॅपला डाउनलोड केलेले आहे. या मोबाइल अॅपला HscopeDaily momo ने बनवले आहे. Rubbish Cleaner हे एक परफॉर्मन्स ऑप्टिमायजर अॅप आहे. या अॅपला 1,000,000 हून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. याला SNT.rbcl ने बनवले आहे. App Lock Keep गुगल प्ले स्टोरवर या अॅपला ५ हजारहून जास्त युजर्संनी डाउनलोड केले आहे. या अॅपला Sheralaw Rence ने बनवले आहे. Inwell Fitness हे एक फिटनेस अॅप आहे. या अॅपला 5,000,000 हून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हे कुणी बनवले याची माहिती अद्याप मिळाली नाही. Horoscope Pi या अॅपला गुगल प्ले स्टोरवरून १ हजारांहून जास्त युजर्संनी डाउनलोड केलेले आहे. या मोबाइल अॅपला Talleyr Shauna ने बनवले आहे. Lockit Master या मोबाइल अॅपला 5,000,000 वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. याची जास्त माहिती मिळाली नाही. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36cwwaD