Full Width(True/False)

LG ने लाँच केले शानदार शानदार वायरलेस इयरबड्स, ५ मिनिटं चार्जिंगमध्ये चालेल १ तास

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची कंपनी ने आपले नवीन शानदार वायरलेस लाँच केले आहेत. कंपनीने यूरोपियन बाजारात टोन फ्री DFP8W इयरबड्स सादर केले असून, याची किंमत १७९ यूरो (जवळपास १५,९०० रुपये) हा ट्रू वायरलेस स्टेरियो (TWS) इयरबड्स आहे. सिंगल चार्जमध्ये २४ तास चालेल. वाचा: एलजीचे हे इयरबड्स यूव्हीनॅनो चार्जिंग केससोबत येतो. याबाबत दावा करण्यात आला आहे की, हे ५ मिनिटात स्पीकर मेंब्रेनवर ९९.९ टक्के एस. ऑरियस बॅक्टेरियावर हटवतो. टोन फ्री DFP8W ला ब्रिटिश ऑडिओ सिस्टम निर्माता मेरिडियनद्वारे ट्यून करण्यात आले असून, यात उत्तम ऑडिओ अनुभव मिळण्यासोबतच, फ्लेक्स अक्शन बास तंत्रज्ञानाने देखील सुसज्ज आहे. कंपनीच्या जर्मन वेबसाइटवर इयरबड्स चारकोल ब्लॅक, हेझ गोल्ड आणि पर्ल व्हाइट रंगात लिस्ट करण्यात आले आहे. मात्र, यांच्या उपलब्धतेबाबत कोणीतीही माहिती देण्यात आलेली नाही. हे इयरबड्स डायमॅनिक ड्राइव्हर्ससोबत येतात, जे खास हाय-फिडेलिटी अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. वाचा: इयरबड्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स या इयरबड्समध्ये तीन डेडिकेटेड मायक्रोफोन देण्यात आले आहे, यातील दोनचा उपयोग वॉयस कॉल आणि तिसऱ्याचा उपयोगी ANC साठी केला जातो. एलजीने यात दोन साउंड मोड दिले आहेत, ज्यात अँबियट आणि चॅटमध्ये स्विच करण्याचा पर्याय मिळेल. लोकांना एर्गोनोमिक फिट देण्यासाठी इयरबड्स तीन मेडिकल-ग्रेड इयरटिप्ससोबत येतात. या व्यतिरिक्त इयरबड्स घाम आणि पाण्यापासून सुरक्षित राहतात. याला IPX४ रेटिंग मिळाले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ v५.२ सोबत पाच डिव्हाइसपर्यंत मल्टी-पेयरिंग सपोर्ट मिळतो. या व्यतिरिक्त गुगल फास्ट पेयरिंग आणि विंडो स्विफ्ट पेयरचा देखील सपोर्ट मिळेल. गेमर्ससाठी खास गेम मोड देखील मिळतो. केवळ ५ मिनिटात होणार चार्ज एलजीने चार्जिंग केसला इयरबड्ससोबतच एकत्र केले आहे, जे यूएसबी टाइप-सीद्वारे वायर्ड चार्जिंग व्यतिरिक्त वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. या व्यतिरिक्त यात फास्ट चार्जिंगचा देखील पर्याय मिळेल. कंपनीचा दावा आहे की, ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये म्यूझिक प्लेबॅकवर एक तास चालेल. या व्यतिरिक्त यात अल्ट्रावॉयलेट लाइट्स दिली आहे, जी इयरफोनवरील किटाणूंना मारण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. टच कंट्रोलद्वारे ऑपरेट होणाऱ्या या इयरबड्समध्ये गुगल असिस्टेंट आणि सिरी वॉयस कमांडचा सपोर्ट मिळेल. याचे वजन केवळ ५.६ ग्रॅम आणि चार्जिंग केसचे वजन ३९ ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jFmW8g