Full Width(True/False)

'लिटिल चॅम्प्स'च्या परीक्षकांना ट्रोल करणाऱ्यांना मृण्मयी देशपांडेचं सडेतोड उत्तर

मुंबई: सारेगमप लिटल चॅम्पसचं पहिलं पर्व खूपच गाजलं. , , ,मुग्धा वैशंपायन आणि यांच्या स्वरानी सगळ्या महाराष्ट्रावर राज्य केलं. आता हे पंचरत्न पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.सारेगमप लिटल चॅम्पसचं नवीन पर्व नुकतंच सुरू झालं असून ही पाच जणं आता थेट परीक्षकांच्या खुर्चीत बसले आहेत. असं असलं तरी आता हे सर्व जणं सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. शोमधील स्पर्धक चांगले गातात, पण 'लिटिल चॅम्प्स'चे परीक्षक ओव्हर अॅक्टींग करतात, असं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे यावेळी स्पर्धेत परीक्षकांच्या खुर्चीत यापूर्वीच्या पर्वाचे गाजलेले स्पर्धक बसले आहेत. ही मंडळी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसतात. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री करत आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयीला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. तसंच पंचरत्नांनादेखील ट्रोल केलं जातंय; त्यांची खिल्ली उडवली जातेय. या ट्रोलिंगला मृण्मयीनेदेखील आता प्रत्युत्तर दिलं आहे. 'समोर असलेले परीक्षक आणि अँकर खूपच आरडाओरडा करतात!' असं एका नेटकऱ्यानं लिहिलं होतं. या वक्तव्याला उत्तर देत मृणमयीनं म्हटलंय, 'तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? शांत बसला असतात का ?' तिनं दिलेलं हे सडतोड उत्तर वाचून अनेकांनी प्रतिक्रिया देत मृण्मयीलाच पाठिंबा दिला आहे. तर काहींनी जुनेच पर्व चांगलं असल्याचं म्हणत त्यावेळी सूत्रसंचालन करणारी पल्लवी जोशीची आठवण काढली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TBowNN