मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं दुसरी पत्नी किरण रावलाही घटस्फोट दिला. ३ जुलैला या दोघांनी आपल्या एक अधिकृत निवेदन देत घटस्फोटाची घोषणा केली. सोशल मीडियावर सातत्यानं आमिरच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाचा आमिरची मुलगी आयरा खाननं दुसऱ्याच दिवशी तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. युझर्स, ही पोस्ट आयरानं वडिलांच्या दुसऱ्या घटस्फोटाबद्दल केली आहे असा अंदाज लावताना दिसत आहे. आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिच्या पोस्ट व्हायरलही होताना दिसतात. पण आता आयरा तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. आमिरनं घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर ४ जुलैला आयरानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती बेडवर झोपून सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'पुढचा रिव्ह्यू उद्या. पुढे काय होणार आहे?' आयराची ही इन्स्टाग्राम स्टोरी पाहिल्यावर अनेक युझर्सनी ही पोस्ट तिच्या वडिलांच्या घटस्फोटासंबंधीच असल्याचा अंदाज लावला आहे. मात्र याबाबत आयरा कोणताही खुलासा केलेला नाही. घटस्फोटानंतर आमिर खान आणि यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ते दोघंही खूश दित आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी यापुढे ते दोघं मिळून मुलगा आझादचं संगोपन करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांनी एकमेकांचा हात पकडलेला दिसत आहे. घटस्फोटाच्या घोषणेनंतरच आमिर आणि किरण यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी आगामी काळातही आम्ही एकत्र काम करणार असल्याचं म्हटलं आहे. किरण रावशी लग्न करण्याआधी आमिर खाननं १९८६ साली रीना दत्ताशी लग्न केलं होतं. आमिर आणि रिना यांना जुनैद आणि आयरा ही दोन मुलं आहेत. पण २००२ साली या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरनं २००५ साली किरण रावशी लग्न केलं. किरण आणि आमिर यांना आझाद हा एक मुलगा आहे. आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36bGR6T