नवी दिल्ली : Vivo X60 सीरिजला भारतात मार्च महिन्यात लाँच करण्यात आले होते. आता कंपनी यावर डिस्काउंट देत आहे. कंपनी या सीरिजमधील X60, आणि X60 Pro+ वर बंपर डिस्काउंट देत आहे. Frame Happiness ऑफर अंतर्गत हे डिस्काउंट दिले जात आहे. वाचाः डिस्काउंटमध्ये या फोनवर १२ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय व्यतिरिक्त ५ हजार रुपये अतिरिक्त एक्सचेंज ऑफर मिळेल. ही ऑफर ऑनलाइन खरेदीवरच मिळेल. कंपनी यावर १० टक्के कॅशबॅक देखील देत आहे. कॅशबॅक ऑफर , आणि च्या ग्राहकांना मिळेल. यासोबतच कंपनी एक्सिडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन देखील देत आहे. ऑफिशियल ई-स्टोरवर HDFC Bank और ICICI Bank क्रेडिट कार्डधारकांना ५ हजार रुपये कॅशबॅक देखील देत आहे. ही ऑफर डेबिट/क्रेडिट कार्डधारकांना ईएमआय ट्रांझॅक्शनवर मिळेल. ऑफर ३१ जुलैपर्यंत सुरू राहिल. वाचाः Vivo X60, X60 Pro आणि X60 Pro+: किंमत हे फोन वेगवेगळे रॅम आणि स्टोरेज पर्यायात येतात. Vivo X60 च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ३७,९९० रुपये आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४१,९९० रुपये आहे. Vivo X60 Pro चे १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ४९,९९० रुपयात उपलब्ध आहे. तर Vivo X60 Pro+ चे १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ६९,९९० रुपयात खरेदी करू शकता. Vivo X60, X60 Pro आणि X60 Pro+: स्पेसिफिकेशन्स Vivo X60 आणि X60 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचे दोन सेंसर्स आहेत. यात फ्रंटमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. Vivo X60 Pro+ मध्ये देखील जबरदस्त कॅमेरा सेटअप मिळेल. यात ५०MP Ultra Sensing GN1 सेंसर, ४८MP, ३२MP आणि ८MP कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत. Vivo X60 आणि X60 Pro हे Snapdragon ८७० चिपसेट सोबत येतात. एक्स६० मध्ये ४३०० एमएएटटी बॅटरी देण्यात आली आहे. तर एक्स६० प्रो आणि विवो एक्स६० प्रो+ मध्ये ४२०० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. Vivo X60 Pro+ Snapdragon ८८८ प्रोसेसरसोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hzh1z1