Full Width(True/False)

‘या’ कंपनीने भारतात लाँच केले दमदार कन्वर्टेबल २-इन-१ लॅपटॉप, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : जपानी कंपनी ने भारतात दोन नवीन लॅपटॉप्स लाँच केले आहेत. या लॅपटॉप्सला कंपनीने UH-X आणि UH-X Convertible 2-in-1 नाव दिले आहे. दोन्ही लॅपटॉप्स ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वाचाः UH-X ची किंमत ८०,९९० रुपये, तर UH-X 2-in-1 ची किंमत ८६,९९० रुपये आहे. या दोन्ही लॅपटॉप्सची विक्री सेलमध्ये २६ जुलैपासून सुरू होईल. दोन्ही प्रोडक्ट्सच्या पार्ट्सवर २ वर्षांची वॉरंटी दिली जाते. याशिवाय बॅटरीवर १ वर्षाची वॉरंटी मिळते, अफ्टर सेल सर्व्हिससाठी सोबत भागीदारी करण्यात आली आहे. FCCL संपूर्ण भारतात पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस कव्हरेज देईल. सोबतच, टॉल-फ्री कॉल आणि ईमेल सपोर्ट देखील मिळेल. Convertible 2-in-1 360° कन्वर्टेबल आहे. याचे वजन ९९७ ग्रॅम असून, यात Intel 11th Gen Core i7 प्रोसेसर देण्यात आला आहे. लॅपटॉप ये Intel Iris Xe Graphics सोबत येतो. यात १३.३ इंच FHD IGZO anti-glare टच डिस्प्ले मिळतो. वाचाः लॅपटॉपच्या फ्रंटला व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाइस बिल्ट इन अ‍ॅक्टिव्ह पेन ४०९६ लेव्हल प्रेशरसह येतो. चार्जिंग फीचरसोबत पेन होल्डर देखील यात मिळते. कंपनीचा दावा आहे याची बॅटरी ११ तास टिकेल. Fujitsu UH-X बद्दल सांगायचे तर याचे वजन ८७८ ग्रॅम असून, याच्या तिन्ही बाजूला पातळ बेझल्स आहेत. कंपनीचा दावा आहे की हा भारतात १३.३ इंच थीन एंड लाइट कॅटेगरीमध्ये सर्वात हलका लॅपटॉप आहे. यात १३.३ इंच FHD anti-glare IGZO पॅनेल डिस्प्ले मिळतो. याचे ब्राइटनेस ४०० नीट्स आहे. कंपनीचा दावा आहे की बॅटरी ३० मिनिटात ५० टक्के चार्जिंग होईल व सिंगल चार्जमध्ये ११ तास चालेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UvYOe5