नवी दिल्ली. आपल्या स्मार्टफोनमध्ये स्पॅम कॉल येतच असतात. कधी कमी तर कधी इतके जास्त की त्यामुळे आपण त्रस्त होतो. परंतु, या स्पॅम कॉल्सकडे दुर्लक्ष करायचे म्हणून वारंवार फोन फ्लाईट मोडवर ठेवणे देखील शक्य होत नाही. कारण, असे केल्याने महत्वाच्या कॉल्सकडे दुर्लक्ष होऊ शकते. तुम्हालाही काही महत्त्वाचे काम करतांना किंवा कुटुंबासमवेत वेळ घालवताना हे कॉल स्पॅम कॉल्स आले असतीलच. याकडे दुर्लक्ष करायचे असल्यास काही टिप्सची मदत तुम्हाला घेता येईल. ज्यामुळे स्पॅम कॉल्सही येणार नाही आणि फोन सतत फ्लाईट मोडवर देखील ठेवावा लागणार नाही. वाचा: पहिला पर्याय जे कॉल्स घ्यायचे नसतील त्यांना फॉवर्ड करण्याचा पर्याय.
- सर्व प्रथम आपल्या फोनच्या सेटिंग्जमधील कॉल पर्यायावर जावे लागेल.
- येथे तुम्हाला कॉल फॉरवर्डिंगचा पर्याय मिळेल.
- कॉल फॉरवर्डिंग वर क्लिक करा.
- त्यानंतर आपणास ' Always Forward ', 'Forward when busy' आणि 'Forward when unanswered ' असे तीन पर्याय मिळतील.
- या तिघांपैकी एक निवडा. आता आपल्याला एक वैकल्पिक क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
- आपण वापरत नसलेला किंवा बंद क्रमांक प्रविष्ट करू शकता .
- क्रमांक प्रविष्ट करुन ते एनेबल करा. यानंतर कोणताही कॉल आपल्याला त्रास देणार नाही.
- फोनच्या सेटींग्ज मध्ये साऊंड वर क्लिक करा.
- येथे तुम्हाला डु नॉट डिस्टर्बचा पर्याय मिळेल.
- त्यावर क्लिक करा. डु नॉट डिस्टर्ब मध्ये Allow repeat callers चालू करा.
- यानंतर आपल्याला कॉल करून त्रास होणार नाही.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xBPPGl