Full Width(True/False)

'जेव्हा मेडल मिळतं तेव्हा आम्ही भारतीय, इतरवेळी 'चिंकी''

मुंबई : अभिनेता आणि प्रसिद्ध मॉडेल याची बायको सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. अंकिताला देखील मिलिंदसारखी व्यायामाची आवड आहे. त्यामुळे ती तिच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलिकडेच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून भारतातील ईशान्येकडील नागरिकांशी होणारा भेदभाव आणि त्यांना दिली जाणारी अवमानकारक वागणूक यावर तिचे मत व्यक्त केले आहे. टोकिओ येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू हिने रौप्य पदक मिळवल्याने देशभर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मिराबाई ही मणिपूरची आहे. या पार्श्वूमीवर अंकिताने ही पोस्ट लिहिली आहे. अंकिताने म्हटले आहे की, 'जर तुम्ही ईशान्य भारतातले असाल आणि जर तुम्ही भारतासाठी पदक जिंकले तरच तुम्ही भारतीय म्हणून ओळखले जाऊ शकता. नाही तर आपण सगळे 'चिंकी', 'चीनी', 'नेपाळी' किंवा मग 'करोना' म्हणून ओळखले जातो. भारत फक्त जातिवादच नाही तर वर्णभेदानेही ग्रासलेला आहे. माझ्या अनुभवांवरून बोलते आहे.' असे म्हणत अंकिताने #Hypocrites हा हॅशटॅग वापरला आहे. अंकिताची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टला अनेक युझर्स पाठिंबा देत आहेत. एका युझरने लिहिले की, 'हे खूपच दुःखद आणि निराशाजनक आहे. भारतामध्ये सांस्कृतिक विविधता असूनही येथे मानवतेची मात्र कमतरता आहे.' आणखी एका युझरने लिहिले, 'तुम्ही अगदी बरोबर लिहिले आहे. तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत योग्य आहे. या मानसिकतेमध्ये बदल व्हायला हवा.' अंकिताने याआधीदेखील उत्तर भारतामध्ये तिला आलेल्या भेदभावाचा अनुभव सोशल मीडियावरून व्यक्त केला आहे. मिलिंद सोमण आणि अंकिताचे २२ एप्रिल २०१८ मध्ये लग्न झाले. अंकिता मिलिंदपेक्षा लहान आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची खूपच चर्चा झाली होती. दरम्यान, अंकिता सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख १९ हजार फॉलोअर्स आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l8pH2z