Full Width(True/False)

निखळ प्रेम! विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड आजही आहे अविवाहित

मुंबई: भारतानं कारगिल युद्ध जिंकल्याच्या घटनेला नुकतीच २२ वर्ष पूर्ण झाली. २६ जुलै १९९९ साली भारतानं पाकिस्तानला मात देत हे युद्ध जिंकलं. ज्यात शहीद कॅप्टन यांचं महत्त्वाचं योगदान होतं. लवकरच कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट '' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांची हृदयद्रावक प्रेम कहाणी देखील दाखवण्यात आली आहे. चित्रपटात विक्रम बत्रा यांच्या गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री कियारा आडवाणी नं साकारली आहे. विक्रम बत्रा शहीद झाल्यानंतर त्यांची गर्लफ्रेंड डिंपल चिमा यांनी कधीच लग्न केलं नाही. जाणून घेऊयात या आगळ्या वेगळ्या लव्ह स्टोरीबद्दल. शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड डिंपल चिमा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं होतं. विक्रम बत्रा यांच्यासोबत डिंपल यांची ओळख १९९५ साली पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगढमध्ये झाली होती. दोघंही एम.ए. इंग्रजी करत होते. उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विक्रम बत्रा यांची निवड भारतीय सैन्यदलात झाली आणि प्रशिक्षणासाठी ते डेहरादूनला निघून गेले. ज्यामुळे दोघांनीही आपलं शिक्षण अर्धवट सोडलं. जेव्हा 'आयएमए'साठी विक्रम बत्रा यांची निवड झाली तेव्हा आमचं नातं अधिक घट्ट झालं असं यावेळी डिंपल चिमा यांनी सांगितलं. डिंपल चिमा या मुलाखतीत बोलताना म्हणाल्या, 'मी विक्रमना कारगिल युद्धावर जाण्याआधी भेटले होते. आम्ही गुरुद्वारामध्ये प्रदक्षिणा घालत होतो. मी पुढे चालत होते आणि विक्रम माझ्या मागे. जेव्हा आमच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या तेव्हा विक्रमनं माझी ओढणी पकडली आणि म्हणाले, 'अभिनंदन मिसेस बत्रा' मी पाहिलं माझ्या ओढणीचं एक टोक त्यांच्या हातात होतं.' डिंपल चिमा पुढे सांगतात, 'या घटनेनंतर जेव्हा पुन्हा मी विक्रम यांना भेटले तेव्हा मी त्यांच्याकडे लग्नाचा विषय काढला होता. त्यावेळी विक्रम यांनी त्यांच्या पाकिटात ठेवलेलं ब्लेड काढलं आणि त्याने आपला अंगठा कापला. अंगठ्यातून निघालेलं रक्त त्यांनी माझ्या भांगेत भरलं. त्याचवेळी आम्ही दोघांनीही निर्णय घेतला की, जेव्हा विक्रम युद्धावरून परत येतील तेव्हा लग्न करू.' अर्थात दुर्दैवानं डिंपल यांची ही इच्छा अपूर्ण राहिली कारण विक्रम बत्रा या युद्धात शहीद झाले. पण त्यानंतर डिंपल यांनी लग्न केलं नाही आणि विक्रम यांची विधवा म्हणून जगण्याचा निर्णय घेतला. विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात या दोघांचीही लव्ह स्टोरी देखील दाखवण्यात आली आहे. चित्रपट 'शेरशाह' बद्दल बोलायचं तर यात सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णू वर्धन यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या १२ ऑगस्टला अमेझॉन प्राइमवर रिलीज होत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f4l4mn