मुंबई: बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेता यांचं आज ७ जुलै रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण अभिनेता यांनी दिलीप कुमार यांना पहिल्यांदा भेटायची संधी मिळाली होती. तेव्हा नेमकं काय घडलं याचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. हा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनुपम खेर यांना सांगितलं होतं, 'दिलीप कुमार साहेब आणि माझी पहिली भेट लक्षात राहणारी ठरली. हा किस्सा 'सारांश' चित्रपट रिलीज होण्याच्या वर्षभरापूर्वीचा आहे. मी अली पीटर जॉन नावाच्या एका पत्रकाराला भेटलो होतो. त्याचा मला फोन आला होता की, स्क्रिन पार्टी आहे. तुम्ही सुद्धा या. कोणतही निमंत्रण नसताना मी जबरदस्तीनं या पार्टीला गेलो होतो. कारण मला समजलं होतं की, दिलीप कुमार साहेब या पार्टीमध्ये येणार आहेत. त्यामुळे मी या पार्टीमध्ये गेलो होतो.' दिलीप कुमार यांना समोरासमोर प्रत्यक्षात भेटल्यावर काय घडलं असा प्रश्न विचारल्यावर अनुपम खेर म्हणाले, 'मी त्यांना नमस्कार केला. त्यांना वाटलं की, मी त्यांना खूप आधीपासून ओळखतो आणि खूप दिवसांनंतर भेटलो आहे. तर त्यांनी प्रेमाने माझ्याशी हात मिळवला. एवढंच नाही तर जवळपास १०-१५ मिनिटं ते माझा हात पकडून पार्टीमध्ये फिरत होते. सर्वांशी माझी ओळख करून देत होते. या पार्टीमधून जेव्हा मी घरी गेलो त्यानंतर दोन दिवस मी अंघोळ केली नाही किंवा हातही धुतला नाही. दिलीप कुमार यांनी आपला हात पकडला याचं त्यावेळी फार अप्रुप होतं.' सारांश रिलीज झाल्यावर अनुपम खेर यांनी सर्व ओळखू लागले होते. दिग्दर्शक सुभाष घई यांनी '' चित्रपटासाठी त्यांना साइन केलं होतं. या चित्रपटात अनुपम यांनी 'डॉक्टर डँग' ही खलनायकी भूमिका साकारली होती. यावेळी दिलीप कुमार यांच्यासोबत घडलेला एक किस्सा अनुपम खेर यांनी सांगितला. अनुपम म्हणाले, 'माझी त्या दिवशी सकाळी ७ वाजताची शिफ्ट होती. त्यामुळे मी मेकअप वैगरे करून तयार होतो. ११ वाजता दिलीप कुमार आले. आल्याबरोबर त्यांनी सुभाष घई यांना चहाची विचारणा केली. मी दिलीप कुमार यांना समोर पाहून स्तब्ध झालो. मी एकटक त्यांच्याकडेच पाहत होतो. त्यांचं निरीक्षण करत होतो. सुभाष घईंच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी मला एका बाजूला नेलं आणि म्हटलं, 'काय करत आहेस? त्यांच्या प्रभावाने एवढा परिणाम झाला तर त्यांना कॅमेऱ्यासमोर कसा सामोरा जाशील.' त्यावर मी त्यांना म्हणालो, आता अनुपम खेर दिलीप कुमार यांना पाहत आहे. पण कॅमेरा ऑन झाल्यानंतर तुम्हाला राणा विश्व प्रताप सिंह आणि डॉक्टर डँगच दिसेल.' त्यानंतर या दोघांमध्ये पडद्यावर जे घडलं त्याला प्रेक्षक अद्याप विसरलेले नाहीत. अनुपम खेर आणि दिलीप कुमार या दोघांच्याही भूमिका प्रचंड गाजल्या होत्या.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hlQaHF