नवी दिल्लीः TV ला कंट्रोल करण्यासाठी रिमोट सर्वात महत्त्वपूर्ण मानले जाते. परंतु, आता आगामी काळात मोबाइल अॅप च्या माध्यमातून आपल्या टीव्हीचे सर्व फंक्शन कंट्रोल करू शकता येतील. गुगलचे एक अॅप आहे. गुगल टीव्हीवर काम करते. याच्या मदतीने तुम्ही अँड्रॉयड टीव्हीवर कंट्रोल करू शकता. गुगल लवकरच या अॅपला लाँच करणार आहे. याच्या मदतीने तुम्ही रिमोट पासून सुटका करून घेऊ शकता. वाचाः टेस्टिंग चालू आहे Google Android टीव्ही रिमोट ऑप्शन ४.२७ व्हर्जन सोबत आणले जाऊ शकते. गुगलने आतापर्यंत याच्याविषयी कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे असे मानले जात आहे की, हे टेस्टिंग मोडवर आहे. रिमोट फीचर अजून पूर्णपणे डेव्हलप करण्यात आले नाही. पंरुतु, गुगल यावर मोठ्या वेगाने काम करीत आहे. वाचाः अपडेशनची शक्यता Android App मध्ये अपडेट करणार आहे. हे अॅप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. ज्यात अनेक वर्षापासून कोणतेही अपडेट करण्यात आले नाही. तर दुसरीकडे हेही म्हटले जात आहे की, गुगल एकदम नवीन टीव्ही अॅप लाँच करू शकते. वाचाः असे करेल काम XDA डेवलपरच्या रिपोर्टनुसार, तुमच्या टीव्हीला कंट्रोल करण्यासाठी सर्वात आधी अॅपला टीव्हीशी पेयर करावे लागेल. त्यानंतर हे तुम्हाला टीव्हीची उपलब्ध यादी दाखवेल. त्यानंतर हे पेयरिंगची प्रक्रिया सुरू होईल. पेयरिंगची प्रक्रिया दरम्यान तुम्हाला यात ४ डिजीटचा कोड टाकावा लागणार आहे. ४ डिजिटचा हा कोड तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा स्मार्टफोन टीव्हीचा रिमोट म्हणून काम करेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hTnFAi