Full Width(True/False)

स्मार्टफोनमधील ‘या’ समस्या घरबसल्या सोडवू शकता, माराव्या लागणार नाहीत मोबाइल सेंटरच्या चकरा

नवी दिल्ली : शिवाय आपले दररोजची अनेक महत्त्वाची कामे करणे अशक्य आहे. कॉलिंग, चॅटिंग, नेट बॅकिंग, मिटिंगसह शॉपिंगपर्यंत अनेक गोष्टी स्मार्टफोनमुळे सोप्या होतात. मात्र, स्मार्टफोनमध्ये थोडाही बिघाड आल्यास मोठी समस्या निर्माण होते. स्मार्टफोन व्यवस्थित काम करत नसल्यास आपण त्वरित सर्व्हिस सेंटर अथवा जवळील मोबाइल दुकानात धाव घेतो. मात्र, काही त्रुटी अशा असतात ज्या तुम्ही घर बसल्यास सोडवू शकता. काही टिप्सच्या मदतीने तुम्ही त्वरित समस्या सोडवता येतील. या जाणून घेऊयात. वाचा : मोबाइल नेटवर्कची समस्या अनेकदा मोबाइल नेटवर्कची समस्या आपल्याला जाणवत असते. ४जी नेटवर्क असल्यावर देखील इंटरनेट स्पीड मिळत नसल्यास त्रास होतो. नेटवर्कच्या समस्येसोबतच स्मार्टफोन देखील यासाठी जबाबदार असतो. अशावेळी तुम्ही , आणि Droid Optimizer अ‍ॅप डाउनलोड करू शकता. याशिवाय वायरस स्कॅन देखील करू शकता. वाचा : फोनच्या कॅमेऱ्यासंबंधी समस्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यासंबंधी समस्या देखील तुम्ही दुरुस्त करू शकता. सर्वात आधी फोनला सेफ मोडमध्ये स्टार्ट करा. फोनला सेफ मोडमध्ये स्टार्ट करण्यासाठी पॉवर बटन काही वेळ दाबून धरा. यानंतर फोन सेफ मोडमध्ये स्टार्ट होण्यासाठी विचारेल. येथे फोनच्या कॅमेरा वापरा. जर व्यवस्थित काम करत असेल तर फोनमधील थर्ट पार्टी अ‍ॅपला कॅमेरा अ‍ॅक्सेस दिल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे तुम्ही काही अ‍ॅप इंस्टॉल केले असतील तर ते डिलीट करा. यामुळे कॅमेरा व्यवस्थित काम करेल. प्ले स्टोरची समस्या अनेकदा अ‍ॅप अथवा गेम डाउनलोड करताना गुगल प्ले स्टोर वारंवार क्रॅश होत असतो. ही समस्या तुम्ही सहज सोडवू शकता. यासाठी सर्वात प्रथम फोनच्या सेटिंग्समध्ये जा. येथे अ‍ॅप्लिकेशनमध्ये ऑल अ‍ॅप्स टॅब निवडा. यात खाली गेल्यावर गुगल सर्व्हिस फ्रेमवर्कचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून डेटा क्लिअर करा. याच टॅबमध्ये गुगल प्ले स्टोरचा देखील पर्याय दिसेल. त्याचा डेटा देखील क्लिअर करा. वाचा : वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ibiITF