मुंबई: टीव्ही अभिनेत्री मागच्या काही महिन्यापासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. कधी खासगी आयुष्य तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे श्वेता चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी श्वेता तिवारी आता एका नव्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. श्वेताचा पूर्वश्रमीचा पती अभिनव कोहलीनं तिचा अंतरीम जामिन रद्द करण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अभिनव कोहलीनं श्वेताच्या विरोधात न्यायलयात याचिका दाखल केली असून श्वेताला लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं लागणार आहे. श्वेता तिवारी महिन्याभरापूर्वीच आगामी प्रोजेक्ट 'खतरों के खिलाडी ११'च्या शूटिंगसाठी केपटाऊनला रवाना झाली होती. त्यावेळी अभिनव कोहलीनं श्वेतावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच श्वेता कोणतीही कल्पना न देता दक्षिण आफ्रिकेला रवाना झाल्याचंही त्यानं म्हटलं होतं आता या प्रकरणावरूनच अभिनवनं न्यायालयात धाव घेतली आहे. श्वेताचा अंतरिम जामिन रद्द करण्याची मागणी अभिनव कोहलीनं केली असून यासंबंधीत याचिका त्यानं न्यायालयात दाखल केली आहे. दरम्यान अभिनवच्या आरोपांवर श्वेतानं उत्तर दिलं होतं. ती म्हणाली, 'त्यानं बोललेल्या गोष्टी साफ खोट्या आहेत. मी माझ्या प्रवासाबाबत त्याला अगोदरच कल्पना दिली होती. तसेच मुलगा रेयांश माझ्या कुटुंबासोबत राहणार आहे असंही मी त्याला सांगितलं होतं. मी फोनवर अभिनवला या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.' श्वेता तिवारीचा पूर्वश्रमीचा पती मागच्या काही वर्षांपासून आपल्या मुलाच्या कस्टडीसाठी न्यायालयात केस लढत आहे. याची सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे. सोशल मीडियावर त्यानं अनेकदा श्वेतानं त्याच्या कायदेशीर नोटीसांना उत्तर न दिल्याचं म्हटलं होतं. दरम्यान श्वेता तिवारी तिचा मुलगा रेयांश आणि मुलगी पलक यांच्यासोबत वेगळी राहते. पण श्वेता आणि अभिनव यांच्यात रेयांशच्या कस्टडीवरून अद्याप भांडणं सुरूच आहेत. अभिनवनं अनेकदा श्वेतावर मुलाला भेटू न देत असल्याचा आरोपही लावला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dKvxme