Full Width(True/False)

व्यक्तीच्या मृत्यूनंतर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंट्सचे नक्की काय होते ? पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्यापासून सोशल मीडियाचा वापर देखील वाढला आहे. , , , असे अनेक प्लॅटफॉर्म यूजर्ससाठी उपलब्ध झाले आहेत. दिवसभर आपण या प्लॅटफॉर्मवर तासंतास घालवत असतो. मात्र कधी विचार केला आहे का मृत्यूनंतर या सोशल मीडिया अकाउंट्सचे काय होत असेल ? वाचाः काही गोष्टी मनुष्याच्या हातात नसतात. काहीसे असेच आयुष्य आणि मृत्यूच्या बाबतीत देखील आहे. कोणाचा जन्म व मृत्यू कधी होईल हे कोणाच्याच हातात नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर राहतात फक्त आठवणी. सोशल मीडियावर आपण फोटो, व्हिडीओच्या माध्मयातून आपल्या भावना व्यक्त करतो. हे प्लॅटफॉर्म एकप्रकारे आपल्या आठवणी साठवून ठेवण्याचेच एक ठिकाण आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर सोशल मीडिया अकाउंट्सचे काय होते जाणून घेऊया. फेसबुक फेसबुकच्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कोणत्याही नातेवाईकाला अकाउंटचा अ‍ॅक्सेस दिला जात नाही. मात्र, व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य फेसबुकला अकाउंटला मेमोरिलाइज्‍ड करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकतो. थोडक्यात, व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोणतीही अन्य व्यक्ती अकाउंट लॉगइन करू शकत नाही. तसेच, व्यक्तीचे अकाउंट सजेस्टिंग फ्रेंड्स लिस्टमध्ये देखील दिसत नाही. इंस्टाग्राम इंस्टाग्रामची पॉलिसी काही प्रमाणात फेसबुक सारखीच आहे. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे अकाउंट बंद केले जाते किंवा आठवण म्हणून सांभाळून ठेवले जाते. मृत्यूनंतर अकाउंट खाली ‘रिमेंबरिंग’ असे देखील लिहून येते. वाचाः ट्विटर याबाबतीत ट्विटरचे नियम थोडे वेगळे आहेत. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास घरातील सदस्य अथवा इतरांनी कंपनीला माहिती दिल्यास, संपूर्ण माहिती गोळाकरून ट्विटर ३० दिवसांच्या आत अकाउंट कायमचे बंद करते. जीमेल जीमेलमध्ये 'Inactive Account Manager' नावाचे एक टूल असते. याच्या मदतीने यूजर्स मृत्यूनंतर त्यांच्या अकाउंटचे काय होईल याचा निर्णय घेऊ शकतात. तुम्ही एक टाइम लिमिट सेट करू शकता, ज्यानंतर डेटा आपोआप डिलीट होईल. याशिवाय तुम्ही अकाउंटवर लक्ष ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला नॉमिनी देखील करू शकता. प्लससाठी देखील हेच नियम होते. मात्र कंपनीने ही सेवा आता बंद केली आहे. यूट्यूब यूट्यूब होल्डरचा मृत्यू झाल्यानंतर याबाबतची माहिती कंपनीला द्यावी लागते. असे न केल्यास काही ठराविक कालावधीनंतर कंपनीकडून ते अकाउंट बंद केले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xR5ba4