नवी दिल्ली : गेल्या महिन्यात टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) चॅनेल सिलेक्टर वेब पोर्टल लाँच केले होते. वर्ष २०१८ मध्ये ने चॅनेल सिलेक्ट अॅप देखील लाँच केले होते. यूजर्स जे चॅनेल पाहत आहेत, केवळ त्यांचेच पैसे ग्राहकांना द्यावे लागतील, असे ट्रायने स्पष्ट केले होते. वाचा: अनेक यूजर्सकडे स्मार्टफोन नसल्याने अ‍ॅप वापरता येत नव्हता. त्यामुळे अशांसाठी ट्रायने वेब पोर्टल लाँच केले होते. येथून यूजर्स जवळपास १५ सर्व्हिस प्रोव्हाइडर्सचे चॅनेल पॅकला बदलू शकतात व पेमेंट करण्याआधी किती पैसे होत आहेत याची माहिती घेऊ शकतील. ट्रायचे हे चॅनेल सिलेक्टर वेब पोर्टल कसे काम करते जाणून घेऊया. वेब पोर्टलचा वापर कसा कराल ?
  • चॅनेल्स बदलायचे असेल तर तुम्हाला CSAP Web Portal वर जावे लागेल.
  • येथे उजव्या बाजूला सबस्क्राइबर लॉगइनचा पर्याय दिसेल.
  • खाली १५ डीटीएच कंपन्यांचे पर्याय मिळतील. येथे कंपनी निवडल्यानंतर एक पेज ओपन होईल, ज्यात तीन पर्याय दिसतील.
  • पहिला पर्याय रजिस्टर्ड फोन नंबरचा असेल. दुसरा पर्याय सबस्क्राइबर आयडी आणि तिसरा सेट टॉप बॉक्स नंबरचा असेल.
  • तुमच्याकडे यापैकी जी माहिती असेल तो पर्याय निवडा.
  • यानंतर तुमच्या फोनवर आलेला ओटीपी भरा.
  • समोर एक नवीन पेज उघडेल. यात तुम्ही कोणकोणते चॅनेल घेतले आहेत ते दिसतील.
  • जर तुम्हाला एखादा चॅनेल घ्यायचा असेल अथवा काढून टाकायचा असल्यास एडिट सबस्क्रिप्शनचा पर्याय मिळेल.
  • यानंतर तुमच्यासमोर चॅनेल्सची लांब यादी येईल.
  • तुम्हाला जर चॅनेल्स अथवा पॅक काढून टाकायचे असतील तर त्या समोरील टिकचा पर्याय काढा.
  • चॅनेल घ्यायचा असेल तर टिक करून सेव्ह ड्राफ्टचा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर Proceed च्या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे ऑप्टिमाइजेशनवर क्लिक करा. त्यानंतर ओकेवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर मोफत चॅनेल्स घ्यायचे आहेत का असे विचारले जाईल. ते चॅनेल्स निवडून Add चॅनेल्सवर क्लिक करा.
  • शेवटी Proceed वर क्लिक करा. यानंतर थोड्यावेळाने तुमच्या पॅकमध्ये बदल होईल.
वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jZf9Cv