नवी दिल्लीः करोना काळ सुरू असल्याने अजूनही शाळा उघडल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाइन क्लास सुरू आहेत. त्यामुळे जर कुणी पालक आपल्या मुलांसाठी स्वस्तात टॅबलेट्सचा शोध घेत असेल तर काही टॅबलेट्स स्वस्त किंमतीत उपलब्ध आहेत. कमी किंमतीत चांगले टॅबलेट्स मिळू शकतात. या टॅबलेटची स्क्रीन तुलनेने मोठी असते. तर लॅपटॉपच्या तुलनेत हे अधिक पोर्टेबल असतात. याशिवाय, किंमतीत सुद्धा हे परवडणारे आहेत. जाणून घ्या स्वस्त आणि मस्त टॅबलेट्स संबंधी. वाचाः Samsung Galaxy Tab A7 Lite सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ७ टॅबलेट ८.७ इंचाचे असतात. याचा डिस्प्ले टीएफटी आहे. याची बॅटरी ५१०० एमएएच क्षमतेची आहे. याचा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. याचा फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. याची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. iBall iTab MovieZ tablet हे टॅबलेट डिस्काउंट मध्ये मिळते. याची किंमत १२ हजार ९६० रुपये आहे. या टॅबलेटची स्क्रीन १०.१ इंचाची आहे. याची बॅटरी ७००० एमएएच क्षमतेची दिली आहे. Lenovo Tab4 8 tablet हे टॅबलेट ११ हजार ४९० रुपयांत येते. याची स्क्रीन साइज ८ इंचाची आहे. याची बॅटरी ४८५० एमएएच क्षमतेची देण्यात आली आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. Panasonic Tab 8 HD tablet या टॅबलेटची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. याची स्क्रीन साइज ८ इंचाची आहे. या टॅबलेट मध्ये ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. याची बॅटरी ५१०० एमएएच क्षमतेची दिली आहे. Lenovo Tab M10 FHD Plus tablet Lenovo Tab M10 FHD Plus tablet ची स्क्रीन १०.३ इंचाची आहे. हे डिस्काउंट सोबत २१ हजार ९९९ रुपयांत मिळते. याची बॅटरी क्षमता ५००० एमएएच आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TTWrS3