Full Width(True/False)

'तुझी जीन्स कोणी फाडली...' म्हणत नेटकऱ्यांनी रिया चक्रवर्तीला केलं ट्रोल

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री सोशल मीडियावर फारशी सक्रिय असलेली दिसत नाही. 'जलेबी' आणि 'मेरे डॅड की मारुती' अशा काही निवडक चित्रपटांमध्ये काम केलेली रिया लवकरच 'चेहरे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सोशल मीडियावरून मात्र जवळपास गायब आहे. पूर्वी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या रियानं सुशांतच्या निधनानंतर सोशल मीडियापासून दूर राहणंच पसंत केलं. ती फार कमी वेळा एखादी पोस्ट किंवा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. रिया चक्रवर्तीनं १ जुलैला २९ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून तिला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच लवकरच चित्रपटांमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली. अर्थात रियानं तिच्या सोशल मीडियावर तिच्या बर्थडे सेलिब्रेशनची कोणतीही पोस्ट शेअर केली नाही किंवा वाढदिवस कसा साजरा करणार याची कोणतीही माहिती तिनं चाहत्यांसोबत शेअर केली नाही. तिनं केवळ शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार मानले. वाढदिवसांनंतर मात्र रियानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात ती स्ट्रीट डॉग्सना खाऊ घालताना दिसत आहे. रियानं याचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ती ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप, व्हाईट जॅकेट आणि रिप्ड जीन्समध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रियानं त्याला 'पपी लव्ह' असं कॅप्शन दिलं आहे. पण रियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र तिला तिच्या कपड्यांवरून बरंच ट्रोल केलं गेलं आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओमधील रियाचे कपडे पाहून विशेष करून तिच्या रिप्ड जीन्सवरून तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एक युझरनं लिहिलं, 'भिकाऱ्यांप्रमाणे कपडे घातले आहे.' तर दुसऱ्या एका युझरनं कमेंट करताना लिहिलं, 'ही जीन्स कोणी फाडली, या डॉग्सनी फाडली आहे का? पुढच्या वेळी थोडे पैसे साठवून तुझी फटलेली जीन्स शिवू घे.' रियाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच 'चेहरे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही काळापूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. ज्यात रियाची झलक पाहायला मिळाली होती. या चित्रपटात रिया चक्रवर्तीसोबतच क्रिस्टल डिसूझा, अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत. खरं तर हा चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होणार होता मात्र लॉकडाऊनमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3waS1TW