मुंबई- बॉलिवूड अभिनेता तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. चाहते कार्तिकच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिक लवकरच लोकप्रिय मराठी दिग्दर्शक यांच्या '' चित्रपटात झळकणार आहे. परंतु, आता कार्तिकच्या या चित्रपटाचं नाव बदलण्यात येणार असल्याचं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपासून मध्यप्रदेश येथून चित्रपटाच्या नावाला जोरदार विरोध होत आहे. त्यामुळे समीर यांनी चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेत चाहत्यांसोबत एक जाहीरनामा शेअर केला आहे. यात आपला उद्देश कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावण्याचा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समीर यांनी ट्विट करत लिहिलं, 'आमचा हेतू कोणत्याही समुदाय किंवा संघटनेला दुखावण्याचा नव्हता. त्यामुळे आम्ही चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी चित्रपटाचं नाव 'सत्यनारायण की कथा' ठेवण्यात आलं होतं परंतु, आता मात्र ते बदलण्यात येणार आहे. यामुळे कुणाला दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. चित्रपटाचे निर्माते आणि क्रिएटिव टीमदेखील या निर्णयात आमच्या सोबत आहे. आम्ही लवकरचं चित्रपटाच्या नव्या नावाची घोषणा करू.' कार्तिकदेखील या चित्रपटात काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. काही काळापूर्वी त्यानेही सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत लिहिलं होतं, 'मी गेले अनेक वर्ष साजिद सरांसोबत काम करण्याची संधी शोधत होतो. आता या चित्रपटाच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली आहे.' समीर यांच्यासोबत काम करण्याबद्दल कार्तिकने लिहिलं, 'मला खूप आनंद आहे की मी साजिद सर, शरीन आणि किशोर सरांसोबत काम करणार आहे. 'सत्यनारायण की कथा' एक म्यूजिकल कथा आहे. त्यात समीर सरांसोबत मला पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळत आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्साहित आहे. त्यासोबतच माझी जबाबदारीदेखील वाढली आहे.' कार्तिक लवकरच 'भूल भुलैया २' आणि 'धमाका' चित्रपटात दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jIF0hM