मुंबई: अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलगी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कृष्णा ही टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीचीही चांगली मैत्रीण आहे. या दोघांचं बॉन्डिंग त्याच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यावर लक्षात येतं. दोघीही अनेकदा एकमेकींसोबत टाइम स्पेंड करताना दिसतात. सोशल मीडियावर एकमेकींच्या फोटोंवर कमेंट करताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णानं तिच्या आणि दिशा पाटनीच्या नात्यावर भाष्य करताना ती दिशाला मोठी बहीण मानत असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री आणि यांनी २०१६ साली 'बेफिक्रा' या म्यूझिक अल्बमसाठी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर हे दोघंही एकमेकांना डेट करू लागल्याचं म्हटलं जातं. दोघंही एकमेकांसोबत वेगवेगळ्या फंक्शन्सला किंवा व्हेकेशनला जाताना दिसतात. अर्थात या दोघांनी उघडपणे या नात्यावर भाष्य केलं नसलं तरीही त्यांच्यातील बॉन्डिंग कोणापासून लपून राहिलेलं नाही. याशिवाय दिशाचं टायगरच्या कुटुंबीयांशी उत्तम बॉण्डिंग आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिशाबद्दल बोलताना टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ म्हणाली, 'दिशा आणि टायगर जवळपास एकमेकांसारखेच आहेत. माझा भाऊ माझा बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे अनेकदा आम्ही एकमेकांसोबत दिसतो. अशात दिशा देखील अनेकदा आमच्यासोबतच दिसते. दिशा खूपच साधी, सरळ आणि एकदम प्रमाणिक व्यक्ती त्यामुळे मी तिच्यासोबत खूप कम्फर्टेबल असते. मी देखील तिच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करत असते. कारण मला वाटतं की आमच्या दोघींमध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत. ' कृष्णा म्हणाली, 'दिशा भलेही वयानं माझ्यापेक्षा लहान आहे पण मी तिला नेहमीच माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मानते. तिचा सल्ला घेते. मी प्रामाणिकपणे सांगू शकते की, ती मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहे. ती माझ्यापेक्षा २ महिन्यांनी लहान आहे. पण ती मोठी बहीण असल्यासारखं मला नेहमी वाटतं. ती स्वतःच्या विश्वात रमणारी असली तरीही तिला आयुष्याचा अनुभव तिला माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मी नेहमीच कोणत्याही गोष्टीवर तिला सल्ला घेते आणि ती देखील मला नेहमीच मदत करते.' दरम्यान कृष्णा श्रॉफ नुकत्याच 'किन्नी किन्नी वारी' या म्यूझिक अल्बममध्ये दिसली होती. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत जॉनी लीवर यांची मुलगी जेमी लीवर आणि जन्नत जुबैर हे सुद्धा दिसले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3i1hQkl