नवी दिल्ली. भारतीय मोबाइल बाजारात सध्या सॅमसंग, रियलमी, मोटोरोला, इन्फिनिक्स आणि जिओनी सारखे अनेक अनेक ब्रॅन्ड्स आहेत. जे उत्तम डिस्प्ले, मस्त कॅमेरा आणि इतर उत्कृष्ट पर्ययासह येतात. मुख्य म्हणजे या स्मार्टफोन्सची किंमत प्रत्येकाला परवडेल अशी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त फोनबद्दल सांगणार आहोत. ज्यांची किंमत कमी आहे आणि त्यात ६,००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. वाचा: Samsung Galaxy M32 नुकताच Samsung Galaxy M32 भारतात लाँच झाला असून या फोनमध्ये ६,००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. याची किंमत १४,९९९ रुपये आहे. हा ड्युअल सिम फोन आहे आणि १ टीबी एसडी कार्ड सपोर्ट करू शकतो. यात ६.४ इंचाचा डिस्प्ले आहे जो सुपर एमोलेड क्वालिटीचा आहे. यात मागील पॅनेलवर चार कॅमेरे असून त्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. Motorola G 10 Power Motorola G 10 Power ९,४९९ रुपयात खरेदी करता येईल. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळतो. तसेच , यात ६.५१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा फोन ६,००० एमएएच बॅटरीसह येतो आणि ४६० प्रोसेसर आणि स्टॉक अँड्रॉइडवर काम करतो. यात मागील पॅनलवर ४८ + ८ + २ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Realme Nazro 30A Realme च्या या फोनमध्ये ६.५१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. तसेच यात १३ + २ मेगापिक्सेल कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून हा फोन ६,००० एमएएच बॅटरीसह येतो. Realme Nazro 30Aमीडियाटेक हेलीओ जी ८५ प्रोसेसरसह आला आहे. याची किंमत ८,९९९ रुपये आहे आणि यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. Infinix Hot 10 Play Infinix च्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी रॅम मिळेल ज्याची किंमत ८,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६,००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा फोन मीडियाटेक हेलिओ जी ३५ प्रोसेसरने सुसज्ज आहे . यात ६.८२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. या फोनमध्ये २५६ जीबी एसडी कार्ड स्थापित केले जाऊ शकते. GIONEE Max Pro हा स्मार्टफोन ६,५९९ रुपयांमध्ये येतो, ज्यामध्ये ६,००० एमएएच बॅटरी आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. या फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. याव्यतिरिक्त, बॅक पॅनलवर यात १३ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, तर समोर ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात युजर्स २५६ जीबीचे मायक्रोएसडी कार्ड ठेवू शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ATDgIG