Full Width(True/False)

साखरपुडा झाला , लग्न कधी करणार? सुयश टिळक म्हणतो...

मुंबई: कलाकारांचं लग्न, साखरपुडा याविषयी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच कुतूहल असतं. त्यांचा जोडीदार कोण याविषयी त्यांना उत्सुकता असते. अभिनेता सुयश टिळक सध्या सोशल मीडियावर याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं चोहत्यांना गोड सरप्राइज दिलं. त्याच्या साखरपुड्याची सध्या सगळीकडे चर्चा होती. सुयशनं साखरपुडा समारंभाचे काही फोटो पोस्ट केल्यावर ते अवघ्या काही मिनिटांतच व्हायरल झाले. त्यानं आयुषी भावेबरोबर साखरपुडा केला. आता या दोघांच्या लग्नाचीही चर्चा सुरू आहे. सुयश आणि आयुषी लग्नाच्या बेडीत केव्हा अडकणार, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. चाहत्यांच्या याच प्रश्नाला सुयशनं उत्तर दिलं आहे. करोनामुळे अनेक निर्बंध आहेत. हे कमी होण्याची आम्ही वाट पाहतोय, लग्नाचा मुहूर्त ठरवला नाहीए, पण येत्या डिसेंबरपर्यंत आम्ही लग्न करायचं, असं ठरवलं असल्याचं सुयश म्हणतो. कोण आहे आयुषी? आयुषी २०१८ सालची ''ची विजेती आहे.साखरपुड्याचे फोटो शेअर करताना सुयश कॅप्शनमध्ये म्हणतो की, 'मी स्वत:ला नशीबवान समजतो. तुझ्यासारखी जोडीदार मला लाभली'. सध्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इंडस्ट्रीतल्या कलाकारांनीसुद्धा दोघांना भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं दिलेलं गोड सरप्राइज चाहत्यांना आवडलं असल्याचं दिसतंय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hTfmo0