नवी दिल्ली. लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग या वर्षाच्या अखेरीस हे नवीन डिव्हाइस लाँच करण्याच्या तयारीत आहे. आता या डिव्हाइसशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे. यापूर्वी, बर्‍याच अहवालांनी असा दावा केला होता की, आगामी S21 FE पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये लाँच करण्यात येणार नाही. वाचा: Samsung Galaxy S21 FE ची संभाव्य वैशिष्ट्ये माय फिक्स गाईडच्या अहवालानुसार, मॉडेल नंबर एसएम-जी ९९०० असलेला आगामी Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन टीआयएनए सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट आहे. यानुसार, Samsung Galaxy S21 FE १२.४ हजाराच्या रीफ्रेश रेटसह ६.४ इंचाच्या एमोलेड डिस्प्ले मिळवेल. त्याशिवाय स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर आणि ४,३७० एमएएच बॅटरी यात देण्यात येणार आहे. Samsung Galaxy S21 FEची बॅटरी ४५ W फास्ट चार्जिंगला समर्थन देईल. याशिवाय डिव्हाइसमध्ये ८ जीबी रॅम उपलब्ध असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, गॅलेक्सी एस 21 एफई स्मार्टफोन अँड्रॉइड ११ वर काम करेल. यासह फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात १२ एमपी प्रायमरी सेन्सर, १२ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि १२ किंवा ८ एमपी टेलिफोटो लेन्स असतील. याशिवाय ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा स्मार्टफोनमध्ये देण्यात येऊ शकतो. Samsung Galaxy S21 FE डिझाइन टेक टिपस्टर इव्हान ब्लास यांनी अलीकडेच आपल्या ट्विटरवर अनेक फोटोज शेयर केली आहेत, ज्यात हे डिव्हाईस स्पष्ट पाहता येतंय. यावरून असा अंदाज येतो की, या डिव्हाइसचे डिझाईन गॅलेक्सी एस 21 सारखे आहे. याशिवाय हे डिव्हाइस ब्लॅक, व्हाइट, ग्रीन आणि जांभळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. Samsung Galaxy S21 FE ची अपेक्षित किंमत सॅमसंगतर्फे अद्याप सॅमसंग गॅलेक्सी एस 21 एफई ची अधिकृत लाँच, किंमत किंवा स्पेसिफिकेशन संबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण, लीक झालेल्या अहवालानुसार या आगामी स्मार्टफोनची किंमत ४०,००० ते ५०,००० पर्यंत असू शकते. कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीस जागतिक स्तरावर सॅमसंग गॅलेक्सी एस 21 लाँच केले. या स्मार्टफोनची किंमत प्रीमियम श्रेणीमध्ये आहे. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे तर, हँडसेटमध्ये बॅटरी आणि एचडी डिस्प्ले आहे. याशिवाय स्मार्टफोनला एक उत्कृष्ट कॅमेरा मिळेल अशीही अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VjEr3T