Realme Days Sale: ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर ५ जुलै पासून Realme Days सेल सुरू करण्यात आला आहे. हा सेल ९ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या सेल मध्ये रियलमीच्या ५ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. ५ ते ९ जुलै दरम्यान रियलमीच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट देण्यात येत असल्याने या स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही या सेलमधील स्मार्टफोनची किंमत आणि त्याची फीचर्स पाहू शकता. स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. रियलमीचे स्मार्टफोन लेटेस्ट आणि दमदार आहेत. या फोनमध्ये देण्यात आलेले सर्व फीचर्स चांगले आहेत. स्मार्टफोनचा कॅमेरा, बॅटरी, प्रोसेसर हे चांगले देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी फक्त उद्यापर्यंतचा वेळ आहे. जाणून घ्या कोणत्या फोनवर किती डिस्काउंट दिला जातो. त्याची किंमत आणि फीचर्स काय आहेत.

Realme X7 Pro 5G
या फोनची किंमत ३२ हजार ९९९ रुपये आहे. परंतुत, या फोनवर १८ टक्के डिस्काउंट देण्यात येत असल्याने हा फोन २६ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनला जर तुम्ही जुन्या फोन सोबत एक्सचेंज केले तर तुम्हाला १५ हजार ३०० रुपयांचा डिस्काउंट दिला जातो. त्यानंतर तुम्हाला हा फोन ११ हजार ६९९ रुपयात मिळू शकतो. या फोनला तुम्ही स्टँडर्ड ९३६ रुपयाच्या प्रति महिना देऊन नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत ४५०० रुपये देऊन खरेदी करू शकता. फोनची पेमेंट करताना जर तुम्ही SBI, Bank of Baroda, ICICI, Flipkart Axis बँक कार्ड्सचा वापर केल्यास तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो.
realme X7 5G
या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर १८ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा फोन १७ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनच्या खरेदीवेळी तुम्ही जर एक्सचेंज कराल तर तुम्हाला १५ हजार ३०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाईल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास तुम्हाला हा फोन फक्त २ हजार ६९९ रुपयात मिळू शकेल. स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत हा फोन ६२४ रुपये प्रति महिना देऊन नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत ३ हजार रुपये देऊन खरेदी करू शकता. जर तुम्ही SBI, Bank of Baroda, ICICI, Flipkart Axis बँक कार्ड्सचा वापर केल्यास तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो.
realme Narzo 30A
या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या फोनवर १५ टक्के डिस्काउंट मिळत असल्याने हा फोन ८ हजार ४९९ रुयपात उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. जुन्या फोन सोबत एक्सचेंज केल्यास तुम्हाला ७ हजार ९५० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जाईल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास हा फोन तुम्हाला ५४९ रुपयात मिळू शकतो. स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत या फोनला २९५ रुपयांच्या प्रति महिना देऊन खरेदी करू शकता. जर तुम्ही SBI, Bank of Baroda, ICICI, Flipkart Axis बँक कार्ड्सचा वापर केल्यास तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो.
realme Narzo 30 5G
या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या फोनवर ११ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा फोन १५ हजार ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनच्या जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत आहे. जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला १५ हजार ३०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाईल. जर तुम्ही फुल व्हॅल्यू मिळवण्यास यशस्वी झाले तर तुम्हाला हा फोन फक्त ६९९ रुपयात मिळू शकतो. स्टँडर्ड ईएमआय फोन अंतर्गत ५५५ रुपये प्रति महिना देऊन नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत २६६७ रुपये देवून खरेदी करू शकता.
realme 8 Pro
या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर १० टक्के डिस्काउंट देण्यात येत असल्याने या फोनला १७ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनची ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आहे. जर तुम्ही फोनला एक्सचेंज करीत असाल तर तुम्ही १५ हजार ३०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाईल. जर तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळत असेल तर तुम्हाला हा फोन फक्त २६९९ रुपयांत मिळू शकतो. स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत ६२४ रुपये प्रति महिना देऊन नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत ३ हजार रुपये देवून खरेदी करू शकता. जर तुम्ही SBI, Bank of Baroda, ICICI, Flipkart Axis बँक कार्ड्सचा वापर केल्यास तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ytwes2