Full Width(True/False)

आमिर खानच नाही तर या सेलिब्रिटींचेही मोडलेत दुसरे- तिसरे संसार

मुंबई- अलीकडेच आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली. दुसरी पत्नी किरण रावपासून विभक्त होण्याचा निर्णय त्याने घेतला. या बातमीनंतर आमीर खान चर्चेत आला. तसे पाहायला गेले तर, बॉलिवूडमध्ये दुसरं लग्न मोडण्याची ही काही पहिली वेळ नाहीए. आतापर्यंत कोणत्या बॉलीवूड सेलिब्रिटींचे दुसरे लग्न मोडले ते पाहू.. संजय दत्तची तिसरी पत्नी आहे मान्यता संजय दत्तचे पहिले लग्न अभिनेत्री रिचा शर्मासोबत झाले होते. ब्रेन ट्यूमरमुळे रिचा शर्माचे निधन झाले. यानंतर संजयचे दुसरे लग्न रिया पिल्लईसोबत झाले. संजय दत्तने २००८ मध्ये रियाला घटस्फोट दिला. यानंतर संजयने २००८ मध्येच तिसरे लग्न मान्यताशी केले. संजय आणि मान्यता यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुलं आहेत. किशोर कुमार यांनी केली चार लग्न लोकप्रिय गायकांपैकी एक किशोर कुमार यांनी रुमा गुहाशी पहिले लग्न केले. यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किशोर कुमार यांनी मधुबालाशी दुसरे लग्न केले. १९६९ मध्ये मधुबाला यांचे निधन झाले. यानंतर किशोर कुमार यांनी योगिता बाली यांच्याशी तिसरे लग्न केले. हे लग्नही फार काळ टिकले नाही. यानंतर त्यांनी चौथं आणि शेवटचं लग्न लीना चंद्रवरकरशी केले. श्वेता तिवारीची मोडली दोन्ही लग्न टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने १९९८ मध्ये राजा चौधरीशी पहिलं लग्न केले. राजा चौधरी आणि श्वेता तिवारी यांना एक मुलगी आहे. १४ वर्षानंतर हे लग्न मोडलं. नंतर श्वेताने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केले. श्वेताचे अभिनवसोबतचा संसारही फारसा चालला नाही. २०१९ मध्ये हे दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. कबीर बेदी यांनी केले तीन लग्न बॉलिवूड तसेच हॉलिवूड चित्रपटात काम करणारे ज्येष्ठ कलाकार कबीर बेदी यांनी डान्सर आणि मॉडेल प्रतिमा बेदी यांच्याशी लग्न केले. ५ वर्षानंतर हे लग्न मोडले. यानंतर कबीर बेदी यांनी ब्रिटिश अँकर निक्कीशी लग्न केले. हे नातंही फार काळ टिकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर कबीर बेदी यांनी वयाच्या 70 व्या वर्षी स्वत: पेक्षा खूप लहान असलेल्या परवीन दोसांजशी लग्न केले. करणसिंग ग्रोवरने बिपाशी बासूशी केलं तिसरं लग्न अभिनेता करणसिंग ग्रोव्हरने श्रद्धा निगमशी पहिलं लग्न केले. हे लग्न काही महिन्यांतच तुटले. यानंतर करणने जेनिफर विगेटशी दुसरं लग्न केले. पण हे लग्नही फक्त दोन वर्षे चालले. यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. काही वर्षांनंतर करणने बिपाशा बासूशी तिसरं लग्न केलं. सिद्धार्थ रॉय कपूरने विद्या बालनशी केलं तिसरं लग्न बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या सिद्धार्थ रॉय कपूरने विद्या बालनशी लग्न केलं. हे त्याचं तिसरं लग्न आहे. सिद्धार्थचं पहिले लग्न आरती बजाजशी झालं होतं. यानंतर त्याचं दुसरं लग्न कविताशी झालं. हे लग्नही फार काळ टिकलं नाही. नीलिमा आझमी यांचा झालाय तीनवेळा घटस्फोट अभिनेत्री नीलिमा आझमी यांचं पहिलं लग्न अभिनेता पंकज कपूर यांच्याशी झालं होतं. हे लग्न फक्त पाच वर्षे चाललं. शाहिद कपूरच्या जन्माच्या काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर नीलिमा यांनी अभिनेता राजेश खट्टर यांच्याशी दुसरे लग्न केलं. इशान खट्टर हा नीलिमा आणि राजेश यांचा मुलगा आहे. २००१ मध्ये नीलिमा आणि राजेश यांचा घटस्फोट झाला. यानंतर नीलिमा यांनी रजा अली खान यांच्याशी तिसरं लग्न केलं. हे लग्नही फक्त पाच वर्षे चाललं आणि दोघांनी २००९ मध्ये घटस्फोट घेतला. अनुराग कश्यपचा झाला दोन वेळा घटस्फोट दिग्दर्शक अनुराग कश्यपने आरती बजाजशी पहिलं लग्न केलं. अनुराग आणि आरती यांना आलिया ही मुलगी आहे. पण दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अभिनेत्री कल्की कोचलीनशी अनुरागने दुसरं लग्न केलं. हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि लवकरच ते दोघेही वेगळे झाले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hzqq9I