नवी दिल्ली : लवकरच नोकिया ब्रँडचे दोन शानदार फोन लाँच करणार आहे. यामध्ये XR20 आणि फीचर फोनचा समावेश आहे. नोकियाच्या या अपकमिंग स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लाँचिंगच्या आधी समोर आले आहे. या दोन्ही फोन्सला Bluetooth SIG सर्टिफिकेशन साइटवर पाहण्यात आले आहे. यानुसार नोकिया एक्सआर२० मध्ये ब्लूटूथ व्ही५.१ आणि नोकिया ६३१० मध्ये ब्लूटूथ व्ही५ सपोर्ट मिळू शकतो. या आधी दोन्ही फोन्सला रशियाच्या रिटेल वेबसाइटवर पाहण्यात आले होते. वाचा: Nokia XR20 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स नोकिया एक्सआर२० ला टीए-१३६२ मॉडेल नंबरने रशियाच्या रिटेल वेबसाइटवर पाहण्यात आले आहे होते. या फोनला अँड्राइड ११ ऑपरेटिंग सिस्टम आणि Qualcomm Snapdragon ४८० ५G SoC प्रोसेसरसोबत सादर केले जाईल. नोकिया एक्सआर२० मध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळू शकते. च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर यात ६.६७ इंच फुलएचडी+ डिस्प्ले पाहायला मिळेल, याचे स्क्रीन रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. फोनमध्ये ४,३६० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह ड्यूल रियर कॅमेर सेटअप मिळेल. याचा सेकेंडरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा असेल. तर सेल्फीसाठी फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. वाचा: Nokia 6310 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स रिपोर्टनुसार, नवीन नोकिया ६३१० आधीच्या व्हेरिएंटपेक्षा वेगळा फीचर फोन असेल. या फोनला टीए-१४०० मॉडेल नंबरने पाहण्यात आले आहे. नोकियाच्या या फीचर फोनमध्ये २.८ इंच डिस्प्ले मिळेल. तसेच, ८ एमबी रॅम आणि १६ एमबी स्टोरेज दिले जाऊ शकते. या फोनमद्ये ०.३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळेल. फोन १,१५० एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जमध्ये बॅटरी एक आठवडा टिकेल. यामध्ये ड्यूल सिम आणि एफएम रेडिओ सपोर्ट देखील मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dS2pcO