Full Width(True/False)

दिया मिर्झाला पुत्ररत्न पण दोन महिन्यांपासून ICU मध्ये आहे बाळ

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री चाहत्यांची प्रचंड लाडकी आहे. दियाने फेब्रुवारी २०२१ मध्ये व्यावसायिक वैभव रेखी सोबत लग्नगाठ बांधली होती. दियाचं लग्न चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात तिने हनीमूनचे फोटो शेअर करत चाहत्यांना ती गरोदर असल्याची गोड बातमी दिली होती. आता आणखी एक पोस्ट करत दियाने तिला मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. परंतु, त्यासोबतच आणखी एक गोष्ट शेअर करत तिने मुलगा गेल्या दोन महिन्यांपासून आयसीयूमध्ये असल्याचं सांगितलं आहे. दियाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत मुलाच्या जन्माची बातमी दिली. परंतु, त्यासोबतच पोस्ट लिहित दियाने म्हटलं की, तिच्या मुलाचा जन्म १४ मे रोजी झाला आहे. परंतु, वेळेच्याआधी जन्मल्यामुळे गेले दोन महिने त्याला आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. दियाने लिहिलं, 'माझ्या गरोदरपणात निर्माण झालेल्या काही अडचणींमुळे डॉक्टरांनी वेळेआधीच ऑपरेशन करून माझ्या मुलाला जीवन दिलं. मी त्या सगळ्यांची आभारी आहे. मी त्यांचेदेखील आभार मानते ज्यांनी या कठीण प्रसंगात कायम मला मदत केली. आमच्या मुलाचं नाव अव्यान आझाद रेखी आहे. त्याचे आजी- आजोबा त्याला कुशीत घेण्यासाठी व्याकुळ झाले आहेत.' या पोस्टसोबत दियाने काही फोटो शेअर करत आपल्या मुलाच्या जन्माचा आनंद व्यक्त केला. सोबत त्याच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. दियाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोबतच चाहते दियाच्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kujGx5