नवी दिल्ली : एरोनॉटिकल इंजीनियर अंतराळात झेपावणारी भारतीय वंशाची तिसरी महिला ठरली आहे. तिने अमेरिकेच्या न्यू मॅक्सिको येथून ब्रिटिश अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासोबत व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीद्वारे यशस्वी उड्डाण परीक्षण केले. शिरीषाच्या आधी कल्पना चावला आणि सुनिता विलियम्स यांनी अंतराळ प्रवास केला आहे. वाचाः १ फेब्रुवारी २००३ ला स्पेस शट कोलंबिया पृथ्वीवर परतत असताना झालेल्या अपघातामुळे कल्पना चावलासह ७ अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. तर सुनिता विलियम्स यांच्या नावावर महिला म्हणून सर्वाधिक स्पेस वॉक करण्याचा विक्रम आहे. भारतीय नागरिक म्हणून सर्वात प्रथम विंग कमांडर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. शिरीषा बांदलाने उड्डाण घेण्याआधी ट्विट केले होते की, यूनिटी २२ च्या शानदार चालक दलाचे सदस्य आणि कंपनीचा भाग बनून सन्मानित करण्यात आले आहे. याचे लक्ष्य सर्वांना अंतराळ सर्वांना उपलब्ध करणे हे आहे. बांदलाचा जन्म आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील चिराला येथे १९८७ साली झाला आहे. तिचे वडील बी मुरलीधर आमि आई अमेरिकेत नोकरी करायचे. ते शिरीषाला आजी-आजोबांकडे सोडून अमेरिकेला गेले होते. त्यानंतर शिरीषा ४ वर्षांची झाल्यानंतर ती देखील अमेरिकेला गेली. वाचाः शिरीषाने पर्ड्यू यूनिव्हर्सिटीच्या ‘स्कूल ऑफ एरोनॉटिक्स अँड एस्ट्रोनॉटिक्स’मधून विज्ञानामध्ये पदवी घेतली. २०१५ मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ बिजनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली. तिला नासासाठी अंतराळवीर बनायचे होते. मात्र डोळ्यांची दृष्टी कमी असल्याने तिला ते शक्य झाले नाही. पर्ड्यू यूनिव्हर्सिटीमध्ये शिकत असाताना तिला प्राध्यपाकांना कमर्शियल अंतराळ उड्डाणांबाबत माहिती दिली होती. त्यानंतर ती त्याच्याशी जोडली गेली. जुलै २०१५ मध्ये शिरीषाने रिचर्ड ब्रॅन्सन यांची कंपनी व्हर्जन गॅलेक्टिकमध्ये काम सुरू केले. केवळ २ वर्षात त्यांच्या कामाने प्रभावित होऊन कंपनीने पदोन्नति दिली. ६ वर्षात तीनदा बढती मिळाल्यानंतर आता शिरीषा कंपनीच्या ‘गव्हर्नमेंट अफेयर्स अँड रिसर्च ऑपरेशन्स’मध्ये वॉइस प्रेसिडेंट आहे. ज्या यानातून (यूनिटी २२) शिरीषा आणि तिच्या सहा सहकाऱ्यांनी उड्डाण घेतले, ते पृथ्वीपासून जवळपास ९० किमी उंचीपर्यंत (२.९५ लाख फूट) गेले होते. उड्डाणाच्या आधी शिरीषा आईसाठी त्यांच्या आवडीची मटन बिर्याणी घेऊन न्यू मॅक्सिकोला पोहचली होती. तर शिरीषाला पिवळी डाळ आवडते. उड्डाण घेण्याआधी ती म्हणाली की, मला वाटते की मी माझ्यासोबत भारताला देखील वरती घेऊन जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ikgOjF