Full Width(True/False)

आता १ लाख रुपये किमतीच्या मोबाईलचे फीचर मिळवा बजेट मोबाईलमध्ये ते सुद्धा फ्री, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. भारतीय बाजारात बजेट सेगमेंटमध्ये बरेच स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ज्यात, मोठी स्क्रीन, मजबूत बॅटरी अशी वैशिष्ट्ये आहेत, तरीही या फोनला मर्यादा असतात. तर, महागड्या आणि प्रीमियम श्रेणीच्या फोनमध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये असतात, जी इतर कोणत्याही फोनमध्ये दिसत नाहीत. आज आम्ही तुम्हाला काही Apps बद्दल सांगणार जे डाउनलोड करून तुम्हाला बजेट फोनमध्ये प्रिमिअम फोनमधील फीचर्स वापरण्याचा अनुभव घेता येईल. वाचा: बजेट स्मार्टफोनमध्ये, युजर्सना टच स्क्रीनचा आनंद तर मिळतो. परंतु, स्वतःच्या हॅन्डरायटिंगमध्ये काही लिहायचे असेल किंवा सॅमसंग गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा सारखं स्क्रीनवर नोट्स तयार करायचे असतील तर ते मात्र शक्य नाही. सॅमसंग गॅलेक्सी नोट २० अल्ट्राची किंमत १ लाखाहून अधिक आहे. हा एक फ्लॅगशिप फोन आहे आणि त्यात एस पेन सारखी बरीच फीचर्स आहेत ज्यात १०८ मेगापिक्सल कॅमेराचाही समावेश आहे. इझी नोट्स - नोटपॅड, नोटबुक App करतील तुमची मदत सॅमसंग गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा सारख्या ऑन-स्क्रीन वैशिष्ट्यासाठी, तुम्ही गूगल प्लेस्टोअर वरून इझी नोट्स - नोटपॅड, नोटबुक, फ्री नोट्स called नावाचे अ‍ॅप डाउनलोड करू शकता. हे अ‍ॅप तुम्हाला स्क्रीनवर काहीही रेखाटण्यास आणि हॅन्डरायटींग नोट्स बनविण्याची परवानगी देतो. तुम्ही अ‍ॅप नोट्स बनविण्यासाठी वापरू शकता . तसेच त्यामध्ये व्हिडिओ आणि फोटो देखील जोडू शकता, जे तुम्हाला नंतरही वापरता येतील. यात व्हॉईस रेकॉर्डर देखील आहे, बोलून देखील नोट्स तयार केल्या जाऊ शकतात. युजर्स त्यांच्या नोट्स काम आणि निवास अशा २ श्रेणींमध्ये विभागू शकतात. तुम्ही टॅबमध्ये हे अ‍ॅप डाउनलोड करून, तुमच्या मुलांना देखील देऊ शकतात, ते या अ‍ॅपच्या मदतीने चित्र रेखाटू शकतील. इतकेच नाही तर हे स्टिकी नोट म्हणून देखील App वापरता येते. तुम्ही त्यांना वेगवेगळ्या रंगांमध्ये विभाजित करू शकता. यात युजर्स महत्वाचे नोट्स पिन करून ठेवू शकतात. इतकेच नाही तर त्यांच्या नोट्सवर रिमांईंडर्स देखील सेट करु शकतात. याच्या मदतीने जुने नोट्स शोधणे देखील अगदी सोपे आहे. हे स्वच्छ इंटरफेससह येते जे युजर्सना नोट्स पुन्हा तयार करण्यात मदत करते . यात ऑडिओ आणि फोटोंसह नोट्स देखील तयार करू शकता. नोट्स तयार करताना नोट्स स्वयंचलितपणे सेव्ह केल्या जातात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TUiLeh