नवी दिल्लीः रिलायन्स जिओने गेल्या वर्षी आपल्या अशा ग्राहकांसाठी स्पेशल रिचार्ज पॅक लाँच केले होते. जे क्रिकेटचे चाहते आहेत. जिओकडे असे रिचार्ज पॅक आहेत. ज्यात डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. जिओ ग्राहक विना अडचण क्रिकेट सामन्याचा आनंद घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला जिओच्या ४९९ रुपयांच्या क्रिकेट पॅक संबंधी सविस्तर माहिती देत आहोत. जाणून घ्या. वाचाः जिओचा ४९९ रुपयांचा क्रिकेट पॅक जिओचा ४९९ रुपयांचा क्रिकेट पॅकची वैधता ५६ दिवसाची आहे. या रिचार्ज पॅक मध्ये कंपनी रोज १.५ जीबी डेटा ऑफर करते. म्हणजेच रोज मिळणारा डेटा पॅक संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. ग्राहकांना या पॅक मध्ये एकूण ८४ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये व्हाईस कॉल आणि एसएमएसची सुविधा मिळत नाही. वाचाः जिओच्या ४९९ रुपयाच्या पॅक मध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीची मेंबरशीप फ्री ऑफर केली जाते. याशिवाय, जिओ अॅप्स सारखे जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, आणि जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. ४९९ रुपयांच्या प्लान शिवाय, जिओ कडे ४ असे प्लान आहेत. ज्यात डिज्नी प्लस हॉटस्टार पॅकच्या कॅटेगरीत ठेवले आहे. यात ६२ रुपये, १००४ रुपये, १२०६ रुपये आहे. १२०८ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xAoQer