Full Width(True/False)

या ३ अ‍ॅप्सच्या मदतीने बनवा Instagram Reel, येतील लाखो व्ह्यूज आणि फॉलोअर्स

नवी दिल्ली : भारतात सरकारने टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर रील्सची लोकप्रियता वाढली आहे. एप्रिलपर्यंत इंस्टाग्राम रील्सचे १० कोटींपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह यूजर्स होते. इंस्टाग्राम रील्सवरी अनेक अ‍ॅप्स प्रचंड व्हायरल होत आहेत व यातून अनेकांना लोकप्रियता देखील मिळत आहे. वाचा : तुम्ही देखील बनवत असाल तर प्ले स्टोरवरील काही अ‍ॅप्सचा वापर करू शकता. या अ‍ॅप्समुळे रील्सवर वॉटरमार्क येणार नाही व अनेक इफेक्ट्स देखील मिळतील. यामुळे रील्स आकर्षक बनतील. या अ‍ॅप्सला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता. हे अ‍ॅप्स कोणते आहेत पाहुयात. इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी अ‍ॅप शोधत असाल तर VN Video Editor चांगला पर्याय आहे. हे अ‍ॅप आयओएस आणि अँड्राइडसाठी मोफत उपलब्ध असून, यामुळे रील्सवर कोणतेही वॉटरमार्क येत नाही. सोबतच एडिटिंग आणि एक्सपोर्टिंग दरम्यान देखील कोणतेही बॅनर दिसत नाही. यात मल्टी ट्रॅक एडिटिंग टूल्स, कर्व शिफ्टिंग आणि व्हिडीओ इफेक्ट्स मिळेल. सोबतच, म्यूझिक लायब्रेरी आणि स्पीड कमी-जास्त करण्याचे फीचर देखील आहे. वाचा : रील्स व्हिडीओ बनवण्यासाठी दुसरे लोकप्रिय अ‍ॅप InShot आहे. यात कस्टम आस्पेक्ट रेशियो आहे व व्हर्टिकल रील्स व्हिडीओ तयार करता येतो, जो मोबाइल स्क्रीनवर फिट बसेल. या व्यतिरिक्त यात टेक्स्ट, कलर इफेक्ट्स, स्थानिक म्यूझिक सारखे फीचर्स मिळतील. व्हिडीओ एडिटिंगसाठी देखील अनेक फीचर्स आहेत. अ‍ॅपमध्ये व्हिडीओला लहान करणे, क्रॉप, झूमचा देखील पर्याय मिळतो. अ‍ॅपच्या मदतीने व्हिडीओमध्ये एनिमेटेड स्टिकर आणि इमोजीचा वापर करू शकता. हे अ‍ॅप अँड्राइड आणि आयफोन दोन्हीसाठी उपलब्ध आहे. FilmoraGo हे आणखी एक शानदार अ‍ॅप असून, याच्या मदतीने तुम्ही व्हिडीओ एडिट करू सकता. हे अँड्राइड आणि आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध आहे. यात रील्स यूजर्ससाठी काही खास फीचर्स देण्यात आले आहे. यात टेक्स्ट टूल्स आणि काही खास फील्टर्स टूल्स मिळतात. व्हिडीओ ट्रिम करणे, वॉयस ओव्हर लावणे आणि क्रॉप करण्याचे फीचर देखील मिळतील. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k5hqfs