मुंबई : प्रसिद्ध संगीतकार आणि इंडियन आयडल १२ चे परीक्षक यांच्या आईचे, बल्किश मलिक यांचे रविवारी, २५ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. सोमवारी सकाळी सांताक्रुझ येथील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीतकार अमाल आणि यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आजीच्या निधनासंबंधी पोस्ट केली. त्यासोबत त्यांनी आजीसोबतचे फोटोही शेअर केले. अनु मलिक यांच्या आईला स्ट्रोक आल्यानंतर गुरुवारी जुहू येथील एका खासगी इस्पितळात त्यांना उपचारांसाठी दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. संगीतकार अमाल आणि अरमान यांनी आपल्या आजीच्या निधनाची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली. यावेळी त्यांनी आपल्या आजीबरोबरचा फोटो शेअर करत तिच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट लिहिली. अरमानने आजीसोबतचा व्हिडिओ शेअर केला अरमान मलिकने आजीसोबतचा एका व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, 'आज माझी सर्वात जवळची मैत्रीण हरपली. माझी प्रिय आजी. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा हिस्सा होती. तिच्या जाण्यामुळे माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून येणारी नाही. माझ्या आयुष्यातील ती सर्वात प्रिय आणि सर्वात महत्त्वाची व्यक्ती होती. माझ्या आयुष्यातील अनेक वर्षे तिच्यासोबत मला घालवता आली. अल्लाह.माझी एंजल आता तुमच्यासोबत आहे.' अमालनेही लिहिली आजीसाठी भावुक पोस्ट अमाल मलिकने देखील आजीच्या आठवणींसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले, ' आजी, आज मी माझ्या हाताने तुझे दफन केले. माझ्या आयुष्यातील ही सर्वात कठीण अशी गोष्ट होती. मी तुला शेवटची मिठी मारून खूप रडलो. परंतु तू आधीच आमच्यापासून दूर निघून गेली होतीस. आजी,तू सांगितले होतेस की, आजोबांच्या बाजूलाच दफन करायला. तुझी शेवटची इच्छा आम्हाला पूर्ण करता आली याचे समाधान आहे. आम्ही तुला घेऊन निघालो तेव्हा पाऊस पडत होता. मी आकाशाकडे पाहिले आणि मला समजून चुकले की तू आजोबांकडे पोहोचली आहेस. आजी दर रविवारी तुझ्यासोबत केला जाणारा नाश्ता, त्यात असलेले आलू पराठे आणि रात्री पिझ्झा पार्टी कायम आठवत राहणार. आजी तू तुझ्या मुलांवर, नातवंडांवर भरभरून प्रेम केले, तू खूप संघर्ष केला, तुला खूप सारे प्रेम आणि आदर.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yjoXM1