मुंबई: विनोदाचे बादशहा व महानायक दिवंगत यांचा चाहता वर्ग आजही मोठा आहे.भाषेच्या जोरावर त्यांनी केलेल्या असंख्य विनोदांनी प्रेक्षकांना वेडं केलं. अगदी दोन वर्षांपर्यंत दादांचे सिनेमे राज्यातल्या अनेक थिएटर्सवर लागत. अशा महानायकाच्या घराची मात्र, आता पडझड झाली आहे. त्यांच्या घराची झालेली दुरावस्था पाहून अभिनेता यानं सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. प्रथमेशनं एक दादा कोंडके यांच्या घराबाहेर उभं राहून एक फोटो काढलाय. फोटोत प्रथमेश दादा कोंडके यांच्या घरासमोर हात जोडताना दिसतोय. यातून त्यानं त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केलाय. पण त्यानं लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काय आहे प्रथमेशची पोस्ट? विस्तीर्ण निळ्या नभाखाली दिसत असलेलं, मोडकळीस आलेलं घरं दुसरं तिसरं कोणाचं नसून, आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार, दादा कोंडके यांचं आहे. हे दादांचं रहातं घरं! हा फोटो zoom (झूम) करून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या घराची किती दयनीय अवस्था झाली आहे ते! आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?ज्या व्यक्तीनं, हाऊसफुलच्या बोर्डाची, चित्रपटगृहाची शोभा वाढविली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं, खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का? प्रश्न अनेक आहेत!! काही सुन्न करणारे तर काही अनुत्तरित....! प्रथमेशनं शेअर केलेल्या या पोस्टनंतर त्याच्या तसंच दादा कोंडके यांच्या चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. तसंच दादांच्या घराचं संवर्धन करण्यात यावं, अशी मागणीही ते करत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wzpTdv