मुंबई छकाही दिवसांपूर्वी '' या शोचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्यातील स्पर्धकांच्या नावांची चर्चा सुरू झाली. संग्राम समेळ, नेहा जोशी, पल्लवी पाटील, सुयश टिळक, तेजश्री प्रधान अशा अनेक आघाडीच्या कलाकारांच्या नावांमध्ये आता आणखी एका नावाची भर पडतेय. अभिनेता या शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. चॅनलनं बिग बॉसच्या या सीझनमध्ये सहभागी होण्याविषयी त्याला विचारलं असल्याचं समजतं. याबाबत त्याचं चॅनलशी बोलणं सुरू असल्याचंही कळतं. चिन्मयचं नाव पहिल्या सीझनपासून चर्चेत आहे. यावेळी तरी तो स्पर्धक म्हणून दिसणार का, याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दुसरीकडे सध्या तो भूमिका करत असलेली 'अग्गंबाई सूनबाई' ही मालिका लवकरच संपणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या मालिकेनंतर चिन्मय बिग बॉसमध्ये दिसण्याची शक्यता आणखीच वाढली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hKkNW7