नवी दिल्ली : सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने नवीन प्रमोशनल सादर केला आहे. या प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. हा प्लान नवीन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. त्यानंतर त्यांना ४४९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये कनव्हर्ट केले जाईल. वाचा: ३९९ रुपयांच्या या प्लानमध्ये यूजर्सला ३० एमबीपीएस स्पीडने १००० जीबी डेटा मिळेल. हाय सपीड डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर २ एमबीपीएस स्पीड मिळेल. ३९९ रुपयांचा हा प्लान घेतल्यानंतर ६ महिन्यानंतर Fibre Basic ४४९ रुपयांच्या प्लानमध्ये ट्रांसफर केले जाईल. यामध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. इतर कोणताही प्लान निवडल्यास यूजर्स ४४९ रुपयांच्या प्लानमध्ये ट्रांसफर होतील. यासाठी यूजर्सला आपल्या जवळील कस्टमर केअर सेंटर किंवा टोल प्री १८००३४५१५९९ वर कॉल करून माहिती घेऊ शकतात. सध्या बीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लान गुजरात, तामिळनाडू, तेलगांना आणि केरळ सर्कलमध्ये उपलब्ध आहे. चा ४४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान : या प्लानमध्ये ३० एमबीपीएस स्पीडने ३३०० जीबी FUP लिमिटपर्यंत डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर २ एमबीपीएस स्पीडने डेटा वापरू शकता. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. ३९९ रुपयांचा Plan: या प्लानमध्ये ३० एमबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा मिळेल. यात ओटीटी बेनिफिट्स मिळत नाही. वाचा: ४९९ रुपयांचा प्लान: एअरटेलच्या या प्लानमध्ये ४० एमबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय Airtel XStream, विंक म्यूझिक आणि Shaw academy चा मोफत अॅक्सेस मिळेल. एअरटेल एक्सस्ट्रीम अॅपमध्ये Eros Now, Voot Basic, Shemaroo M, Hungama Play आणि Ultra चा अॅक्सेस मिळेल. ३९९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये ३० एमबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळतो. एक वर्षासाठी सबस्क्रिप्शन घेतल्यावर हा प्लान ३९९ रुपयात मिळेल. तसेच, Excitel ने गेल्यावर्षी ब्रॉडबँड प्लानची नवीन रेंज सादर केली होती. यात ५०० रुपयांमध्ये ३०० एमबीपीएस स्पीडचा प्लान मिळतो. या प्लानची वैधता १ महिने, ३ महिने, ३ महिने, ६ महिने, ९ महिने आणि १२ महिने आहे. Excitel यूजर्स एक वर्षाचा प्लान घेऊ शकतात. यात ५०० रुपये कमी किंमतीत १०० एमबीपीएस आणि ३०० एमबीपीएस स्पीड मिळेल. यात अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळते. ४७८८ रुपये वर्षाला यानुसार महिन्याला ३९९ रुपये मोजावे लागतील. ५९८८ रुपये वर्षाला यानुसार महिन्याला ४९९ रुपये मोजावे लागतील. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x2d8It