मुंबई: अंकिता लोखंडे आणि दिवंगत सुशांतसिंह राजपूत या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेली 'पवित्र रिश्ता' ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. आता या मालिकेचं पुढचं पर्व '' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकिता लोखंडे आणि दिवंगत सुशांतसिंह राजपूत या जोडीनं प्रेक्षकांना वेडं लावलं होतं. त्यामुळं सुशांतच्या मृत्यूनंतर निर्माता एकता कपूरनं सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. आता या दुसऱ्या पर्वाची शूटिंग देखील सुरू झाली आहे. मालिकेच्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'पवित्र रिश्ता'च्या नव्या पर्वात टीव्ही अभिनेता शाहीर शेथ मानवची भूमिका साकारणार आहे. तर अर्चना म्हणून अंकिता लोखंडे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहीर आणि अंकिताच्या लूक सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. तर मराठी अभिनेत्री देखील मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रेक्षकांच्या आवडत्या उषा नाडकर्णी देखील मालिकेत आहेत. अंकिताचा मानव फक्त सुशांतच काही दिवसांपूर्वी पवित्र रिश्ता मालिकेला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांशी लाईव्ह संवाद साधला होता. यावेळी तिने पवित्र रिश्ता मालिकेतील दिवसांच्या काही आठवणी, मनोरंजक किस्से चाहत्यांबरोबर शेअर केले. अंकिताने सांगितले, 'पवित्र रिश्ताच्या सेटवर सुशांत मला अभिनय शिकवायचा. अंकिता पुढे म्हणाली, 'सुशांत आता आपल्यात नाही. त्याच्याशिवाय 'पवित्र रिश्ता' ही मालिका अपूर्ण आहे. अर्चनाचा मानव फक्त तोच असू शकतो. त्याच्याशिवाय सर्व गोष्टी अपुऱ्या आहेत. सुशांत जिथे कुठे असेल तिथून आपल्या सर्वांना पाहून आनंदी होईल. सुशांतने मला अभिनय कसा करायचा हे शिकवले. तो मला सिनीअर होता.' असं ती म्हणाली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3k9XQPc