Full Width(True/False)

'छोट्या कंगना'ची चर्चा, युझर्स म्हणाले 'अभ्यास करते की नाही'

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सातत्यानं तिचे फोटो आणि आगामी प्रोजेक्टच्या अपडेट सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसते. अर्थात तिच्या वक्तव्यांमुळे तिच्यावर टीका करणारे अनेकजण असले तरीही तिचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. याच चाहत्यापैकी एक आहे कंगनाची ही छोटी चाहती. जिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. कंगना रणौतच्या चाहत्यांमध्ये एक छोटी मुलगी देखील तिची चाहती आहे. जिचं इन्स्टाग्रामवर अकाउंट देखील '' या नावानं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चिमुकल्या चाहतीनं कंगनाचे लुक कॉपी करून त्याचे कोलाज फोटो शेअर केले आहेत. याशिवाय कंगनाचा अभिनय करतानाचे तिचे काही व्हिडीओ देखील तिनं शेअर केले आहेत. कंगनाच्या या छोट्या चाहतीचं टॅलेंट पाहून सर्वच हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर कंगनाच्या या छोट्या चाहतीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. जे पाहून स्वतः कंगना रणौत सुद्धा इम्प्रेस झाली आणि तिच्यावर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या मुलीचा व्हिडीओ शेअर करत कंगनानं लिहिलं, 'ओय छोटी, तू अभ्यास वगैरे करतेस की नाही की पूर्ण दिवस हेच सर्व करत असतेस.' कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचं तर तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहे. यापैकी काही चित्रपटांचं शूटिंग पूर्ण झालंय, काहींच चालू आहे, तर काही चित्रपटांचं शूटिंग आगामी काळात सुरू होणार आहे. कंगनाकडे सध्या तमिळनाडूच्या दिवंगत पंतप्रधान जे. जयललिता यांचा बायोपिक 'थलायवी', दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बायोपिक, 'धाकड', 'तेजस' असे अनेक चित्रपट आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3k3anDL