नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर Electronics sale सुरू आहे. या सेलमध्ये यूजर्स बंपर डिस्काउंटसह इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करत आहे. या सेलमध्ये टीव्हींवर देखील मोठी सूट दिली जात आहे. अशाच सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-१० टीव्हींबाबत जाणून घेऊया. वाचा :
- Realme 32-inch LED smart Android TV: रियलमीच्या या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही २ हजार रुपये डिस्काउंटसह १५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. हा अँड्राइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
- 32-inch HD Ready LED : सॅमसंगच्या या एचडी स्मार्ट टीव्हीची किंमत १९,९९० रुपये आहे. मात्र, डिस्काउंटसह १७,४९९ रुपयात खरेदी करू शकता. टीव्ही ३२ इंच एलईडी पॅनेल आणि ओटीटी सर्व्हिस सपोर्टसह येतो.
- 43-inch LED smart TV 2020 edition: एलजीच्या ४३ इंच एलईडी स्मार्ट टीव्हीची किंमत ४०,९९० रुपये आहे. मात्र, ९ हजार रुपये डिस्काउंटसह ३१,९९० रुपयात खरेदी करू शकता. टीव्हीमध्ये FHD डिस्प्ले आणि webOS ओएस देण्यात आले आहे.
- Vu Premium 50-inch Ultra HD LED smart TV: Vu चा ५० इंच ४के UHD २४ हजार रुपये डिस्काउंटसह ३६,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. हा अँड्राइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो व यात बिल्ट-इन क्रोमकास्ट, गुगल प्ले स्टोर आणि इतर ओटीटी सर्व्हिस सपोर्ट मिळेल.
- OnePlus U1S 50-inch) 4K LED smart TV: OnePlus U1S smart TV ५० इंच ४के UHD डिस्प्ले आणि अँड्रॉइड टीव्ही ओएससोबत येतो. टीव्हीला तुम्ही डिस्काउंटनंतर ४६,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
- Motorola Revou 55-inch 4K LED smart TV: ५ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर Motorola Revou 55-inch 4K UHD smart TV ४४,९९९ रुपये किंमतीत मिळत आहे. यात Dolby Atmos आणि Dolby Vision सपोर्ट मिळतो.
- Hisense A73F 55-inch Ultra HD LED smart Android TV: Hisense स्मार्ट टीव्ही ५५ इंच ४के पॅनेल आणि डॉल्बी व्हिजन व एटमॉस सपोर्टसह येणाऱ्या १०२ वॉट जेबीएसच्या सहा स्पीकर्स सेटअपसह येतो. टीव्हीची मूळ कंमत ५९,९९० रुपये आहे, मात्र डिस्काउंटनंतर ४७,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
- iFFALCON by TCL 55 inch Ultra HD LED smart Android TV: १,०६,९९० रुपये किंमत असलेल्या iFFALCON च्या या टीव्हीवर तब्बल ६५ टक्के सूट मिळत असून, तुम्ही टीव्हीला फक्त ३६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. टीव्ही HandSense टेक्नोलॉजी आणि वॉयस सर्च फीचरसोबत येतो.
- Mi 4X 50-inch Ultra HD LED smart Android TV: ४१,९९९ रुपये किंमत असलेल्या ५० इंच Mi 4X 4K UHD स्मार्ट टीव्ही ३४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. हा टीव्ही अँड्राइड टीव्ही ओएसवर चालतो व वॉयस रिमोटसह येतो.
- Nokia 55-inch Ultra HD LED smart TV: नोकियाचा ५५ इंच स्मार्ट टीव्ही डिस्काउंटनंतर ३४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. हा टीव्ही Onkyo powered ४८ वॉट स्पीकर सेटअप डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह येतो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2T0lbHM