नवी दिल्ली : अंतराळ पर्यटनासाठी स्पर्धा सुरू झाली असून, आता पाठोपाठ अमेरिकेच्या (FAA) ने या कंपनीला अंतराळात प्रवाशांना नेण्यास परवानगी दिली आहे. ब्लू ओरिजिन न्यू शेपर्ड लाँच सिस्टमद्वारे लोकांना अंतराळात घेऊन जाणार आहे. वाचाः अॅमेझॉनचे माजी चीफ एग्झिक्यूटिव्ह देखील पुढील आठवड्यात अंतराळात झेपावणाऱ्या या प्रवासाचा भाग असतील. एफएएकडून ब्लू ओरिजिनला देण्यात आलेली परवानगी ऑगस्टपर्यंत ग्राह्य असेल. तसेच, टेक्सास येथून उड्डाणास परवानगी देण्यात आली आहे. ब्लू ओरिजिनला टेस्ट फ्लाइटदरम्यान लाँच व्हिकल्सचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करत आहे की नाही हे दाखवणे गरजेचे होते. एफएएने सर्व गोष्टी व्यवस्थित असल्याची पुष्टी केली आहे. वाचाः जेफ बेझॉस हे न्यू शेफर्डद्वारे २० जुलैला अंतराळात उड्डाण घेण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आणि इतर दोन प्रवासी असतील. दरम्यान, नुकतेच ब्रिटिश उद्योगपती रिचर्ड ब्रँन्सन यांची कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकने यशस्वीरित्या अंतराळ उड्डाण पूर्ण केले आहे. यावेळी रिचर्ड ब्रँन्सन यांच्यासोबत इतर सहा प्रवासी देखील होती. या अंतराळ प्रवासात भारतीय वंशाची एरोनॉटिकल इंजीनियर शिरीषा बांदलाचा देखील समावेश होता. शिरीषा बांदला अंतराळात झेपावणारी भारतीय वंशाची तिसरी महिला ठरली आहे. शिरीषाच्या आधी कल्पना चावला आणि सुनिता विलियम्स यांनी अंतराळ प्रवास केला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i8lAk9