नवी दिल्लीः Samsung ने आपला गॅलेक्सी M सीरीजचा पॉप्युलर बजेट स्मार्टफोन Galaxy M02 ला १ हजार रुपयांनी महाग केले आहे. फोनची वाढलेल्या किंमतीची माहिती रिटेलर महेश टेलिकॉमने एका ट्विट मधून दिली आहे. ट्विटच्या माहितीनुसार, किंमतीत वाढ झाल्यानंतर या फोनचे २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर या फोनच्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनसाठी आता ८ हजार ४९९ रुपये मोजावे लागतील. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी M02 चे फीचर फोनमध्ये 720x1600 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.५ इंचाचा एचडी इनफिनिटी-V डिस्प्ले दिला आहे. हा फोन ३ जीबी पर्यंत रॅम आणि ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेज सोबत येतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत स्टोरेजला वाढवता येते. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये क्वॉड कोर MT6739WW चिपसेट ऑफर करीत आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ड्युअल नॅनो सिम सपोर्टच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G, WLAN, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी आणि 3.5mm हेडफोन जॅकसारखे ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hzdPV6