नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त सुविधा आणली आहे. कंपनीने युजर्संना आकर्षित करण्यासाठी एक नवीन आणि पहिला रिचार्ज कूपन (FRC) आणली आहे. याची किंमत ४५ रुपये आहे. हे एफआरसी एक प्रमोशनल स्कीम अंतर्गत लाँच करण्यात आले आहे. याची वैधता लिमिटेड पीरियडसाठी वैध असणार आहे. वाचाः ४५ रुपयांत मिळेल हे बेनिफिट्स रिचार्ज अंतर्गत ४५ रुपयांत एफआरसी १० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस ऑफर मिळेल. हे ४५ दिवसांसाठी वैध असणार आहे. ४५ दिवस पूर्ण झाल्यानंतर बीएसएनएल युजर्स लकवरच आपल्या आवडत्या कोणत्याही प्लानवर स्विच करू शकता. हे एफआरसी ६ ऑगस्ट पर्यंत प्रचाराच्या आधारावर आणले गेले आहे. वाचाः बीएसएनएल फ्री देत आहे ४जी सिम याशिवाय, कंपनी एक फ्री सिम प्लान घेऊन आली आहे. जी ३१ जुलै पर्यंत अॅक्टिव राहणार आहे. बीएसएनएलच्या केवळ नवीन युजर्ससोबत एमएनपी पोर्ट इन ग्राहक, फ्री ४जी सिम ऑफरचा लाभ मिळवू शकतात. बीएसएनएलच्या ४जी सिम कार्डची किंमत २० रुपये आहे. नवीन युजर्ससाठी हे फ्री असणार आहे. हे केवळ १०० रुपयांच्या वरच्या पहिला रिचार्ज कूपनचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना लागू होणार आहे. बीएसएनएल कस्टमर सर्विस सेंटर किंवा आपल्या जवळच्या बीएसएनएल रिटेलरच्या दुकानातून सिम कार्ड घेऊ शकता. वाचाः एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि जिओ ग्राहकांना जवळपास एकसारखेच प्लान आहेत. ज्यात ५० रुपयांपेक्षा कमी डेटा प्लान असतील. जे बीएसएनएलच्या नवीन ४५ एफआरसी सोबत स्पर्धा करतील. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k4kpVa