Full Width(True/False)

BSNL यूजर्संना भेट, २ प्लान रिवाइज केले, आता ६०० जीबी डेटा, फ्री कॉलिंगसह अन्य बेनिफीट मिळवा

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड टेलिकॉम कंपनीने जिओ आणि एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी अनेक खास प्लान लाँच केल आहेत. नुकतेच कंपनीने युजर्संसाठी ४४७ रुपयाचा प्लान लाँच केला आहे. तर १९९९ आणि २४७ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे. बीएसएनएल चेन्नई आणि बीएसएनएल तामिळनाडूकडून या बदलाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या या प्लानमध्ये कोणता बदल करण्यात आले आहेत. वाचाः ने लाँच केला ४४७ रुपयांचा प्लान सर्वात आधी बीएसएनएलच्या ४४७ रुपयांच्या एसटीव्ही प्लानच्या फायद्याविषयी जाणून घेऊ. बीएसएनएलचा प्लान कोणत्याही डेली डेटा लिमिट शिवाय 100GB डेटा ऑफर केला जातो. तसेच प्लान सोबत सब्सक्राइबर्संना EROS नाउ एंटरटेनमेंट सर्विसेज फ्री दिली जाते. याशिवाय, प्लानमध्ये रोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. या प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. म्हणजेच दोन महिने रिचार्ज पासून सुटका आहे. वाचाः BSNL च्या २४७ रुपयांच्या प्लानमध्ये झाला बदल बीएसएनएलने एसटीव्ही २४७ रुपयांच्या प्लानमध्ये संशोधन केले आहे. २४७ रुपयांच्या प्लानसोबत आता युजर्संना ५० जीबी हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, रोज १०० एसएमएस, बीएसएनएल ट्यून्स आणि इरोज नाउ इंटरटेमेंटचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. हे प्रीपेड ३० दिवसांच्या वैधतेसोबत येते. या प्लानमध्ये आधी रोज ३ जीबी हाय स्पीड डेटा दिला जात होता. वाचाः BSNLचा १९९९ रुपयांचा प्लानसोबत मिळणार हे फायदे बीएसएनएलचा १९९९ रुपयांचा प्लान मध्ये आता ९० दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना ५०० जीबी हाय स्पीड डेटा आणि १०० जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, रोज १०० एसएमएस, अनलिमिटेड साँग चेंज ऑप्शन सोबत फ्री PRBT, लोकदुन कंटेंट, इरोस नाउ इंटरटेनमेंट सर्विस मिळते. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये आधी रोज २ जीबी हाय स्पीड डेटा दिला जात होता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36pkafs