मुंबई : मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते काहीही करायला तयार असतात. कधी ते त्यांच्यासाठी गिफ्ट पाठवतात, तर कधी त्यांच्या फोटोंचे कोलाज करून आपल्या आवडत्या कलाकाराबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. केवळ इतकेच नाही तर काही चाहते तर आपल्या आवडत्या कलाकाराच्या घरी अथवा चित्रीकरणाच्या स्थळी त्यांना भेटायला जातात. असाच अनुभव अभिनेत्री ला आला. जान्हवी शुक्रवारी सकाळी जिममधून बाहेर पडून घरी जात होती. त्यावेळी जिमच्या गेटच्या बाहेर तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. त्यामध्ये खास जान्हवीला भेटायला म्हणून राजस्थानहून आलेला तिचा एक चाहताही होता. जान्हवी जेव्हा जिममधून बाहेर आली आणि गाडीकडे जात होती, तेव्हा त्या चाहत्याने ओरडून तिचे लक्ष वेधून घेतले. जान्हवीचे त्याच्याकडे लक्ष जाताच त्याने राजस्थानहून खास भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. हे सांगितल्यानंतर जान्हवीने तिच्या बॉडागार्डना त्याला आत घेण्यास सांगितले. गेटमधून आतमध्ये आल्यानंतर चाहत्याने जान्हवीला त्याने आलेले मोठे गिफ्ट दिले. तिच्यासोबत फोटो काढला. जान्हवीने त्याने आणलेल्या गिफ्टचा स्वीकार केला ते उघडून पाहिले आणि गाडीत बसून निघून गेली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय म्हणाले युझर्स जान्हवीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जान्हवीवर युझर्सने टीका करायला सुरुवात केली. कारण या चाहत्यासोबत वागताना जान्हवी अॅटिट्यूड दाखवत होती. ही गोष्ट अनेकांना खटकल्याने त्यांनी जान्हवीवर टीका करायला सुरुवात केली. एका युझरने लिहिले, 'ही इतकी उद्धटपणे काम वागत आहे. हिला अभिनय तर येत नाही...' आणखी एका युझरने लिहिले की, 'आताच इतका अॅटिट्यूड आहे हिला...' चाहत्याने दिलेले गिफ्ट उघडून पाहिल्यानंतर जान्हवीने त्याचे रॅपर तिथेच टाकून दिले होते. त्यामुळेही तिच्यावर टीका झाली. एका युझरने लिहिले, 'सुशिक्षित पण असभ्य व्यक्ती.' दरम्यान, जान्हवीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर तिचा 'रुही' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा होते. आता जान्हवी ' दोस्ताना २', 'तख्त' या सिनेमांमध्ये दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hYFpKo