नवी दिल्ली. करोना व्हायरस ने संपूर्ण देशातील लोकांना प्रभावित केले. अशात बर्‍याच जणांना घरातून काम करावे लागत आहे. तसेच, निर्बंधामुळे बाहेर जाणे, मित्रांना भेटणे देखील कमी झाले आहे. अशात कामासाठी तसेच मित्र आणि कुटूंबाच्या संपर्कात राहण्यासाठी इंटरनेटवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी इंटरनेटचा वापर देखील वाढला आहे. वाचा: मित्र- कुटुंबियांसोबत व्हॉइस कॉल करण्यासाठी सध्या अनेक जण सध्या व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची मदत घेत आहेत. पण, नियमित व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करायचे असल्यास डेटा देखील खूप प्रमाणात वापरला जातो. कधी कधी तर फोन कॉल सुरु असतांनाच डेटा संपल्यामुळे कॉल मध्येच कट होतो. तुम्हाला देखील हिच अडचण येत असेल तर आज आम्ही काही भन्नाट टिप्स सांगत आहो ज्यांच्या मदतीने तुम्ही कमीत- कमी डेटा वापरून देखील नियमित WhatsApp कॉल करू शकाल. यासाठी काय आवश्यक आहे तुमच्याकडे व्हॉट्सअॅपच्या नवीन आवृत्ती अपडेटेड असल्याचे सुनिश्चित करा. अ‍ॅपएन्ड्रॉइड- २.२१.१२.२१ आयओएस - २.२१.१३०.१५ १. आपल्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप उघडा. त्यानंतर अ‍ॅपच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील तीन उभ्या डॉट्सवर टॅप करा आणि सेटिंग्ज वर क्लिक करा. ३ . स्टोरेज आणि डेटा पर्यायावर टॅप करा. ४. कॉल पर्यायासाठी कमी डेटा वापरणे टॉगल करून एनेबल करा. टीपः आयओएससाठी त्याच स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे. परंतु, आपण आयफोनवरील व्हॉट्सअॅपच्या मुख्य स्क्रीनवरून सेटिंग्जमध्ये थेट जाऊ शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TVQ7td