मुंबई : डान्स रिअॅलिटी शो असलेल्या 'डान्स दीवाने ३' कार्यक्रमाच्या आठवड्याअखेरीस प्रसारित होणाऱ्या भागामध्ये निर्माता- दिग्दर्शक आणि अनिल कपूर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात रोहितचे आगमन होत असल्याचं सूत्रसंचालक हर्ष लिंबाचियाने जाहीर केले. त्यानंतर कार्यक्रमाची सहसूत्रसंचालक असलेली प्रचंड उत्साहित झाली. या प्रसंगाचा व्हिडीओ भारतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. काय केले भारतीने कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि भारतीचा नवरा हर्षने रोहित शेट्टी स्टेजवर येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर भारती कमालीची उत्साहित झाली. तिने आनंदाने ओरडायला सुरुवात केली. रोहित जेव्हा स्टेजवर आला तेव्हा भारतीने त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला आणि त्यानंतर त्याच्या गालावर किस केले आणि त्याला मिठीदेखील मारली. भारती हे सगळे करत असताना हर्ष तिथेच उभा होता. परंतु त्याने भारतीला काहीच फरक पडला नाही. ते पाहून हर्षने एक मजेशीर कमेन्ट केली. काय म्हणाला हर्ष भारती उत्साहाच्या भरात जेव्हा रोहित शेट्टीला किस करते, त्याला मिठी मारते तेव्हा हर्ष म्हणतो, ' सोशल डिस्टन्सिंग पाळा...' त्यानंतर तो रोहितला म्हणतो की, लग्नानंतर तो आणि भारती सोशल डिस्टन्सिंगचेच पालन करत आहेत.. त्यावर रोहित देखील हजरजबाबीपणाने उत्तर देतो की, म्हणूनच ही हालत आहे. दरम्यान, रोहित शेट्टी अलिकडेच दक्षिण आफ्रिकेतून परत आला आहे. तिथे तो 'खतरों के खिलाडी ११' कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी गेला होता. या कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यासाठी म्हणून रोहित डान्स दिवाने या कार्यक्रमाच्या सेटवर आला. गेल्यावर्षी भारतीदेखील खतरों के खिलाडी कार्यक्रमात सहभागी झाली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TMxWpX