मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. करिनानं बॉलिवूडमध्ये अनेक नवे ट्रेंड सेट केले आहेत तसेच अनेक नवे बदल घडवून आणले आहेत. ज्याचा इतर अभिनेत्रींवर फार मोठा परिणाम दिसून आला आहे. करिना आपल्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. करिना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर करिना सोशल मीडियावर बिनधास्तपणे तिचे फोटो शेअर करताना दिसते. पण अद्याप तिनं आपल्या दुसऱ्या मुलाचा चेहरा कोणालाच दाखवलेला नाही. नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट केल्यानंतर करिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. करिनाच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला 'तू पुन्हा प्रेग्नन्ट आहेस का?' अशा आशयाचे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. करिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती अल्ट्रासाउंड कॉपी दाखवताना दिसत आहे. करिनाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून करिनाला भांडावून सोडलं आहे. पण करिनाच्या या पोस्टचा अर्थ काही वेगळाच आहे. करिना कपूरनं हा फोटो शेअर करताना लिहिलं,'एका वेगळ्या आणि रंजक विषयावर काम करत आहे. पण तुम्ही विचार करताय तसं काही नाही आहे.' पण करिनाच्या चाहत्यांनी मात्र या पोस्टवरून तिला प्रेग्नन्सीबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. एका युझरनं लिहिलं, 'तू पुन्हा आई होणार आहे का? एवढ्या लवकर कसं काय?' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, 'आता पुन्हा एकदा?' अर्थात युझर्स विचार करत आहेत असं काही नाहीये. करिना पुन्हा आई होणार नाही आहे. करिना कपूरनं एक पुस्तक लिहिलं आहे. ज्यात तिनं दोन्ही मुलांच्या प्रेग्नन्सीच्या वेळचे तिचे अनुभव आणि माहिती दिली आहे. याच पुस्तकाला तिनं आपला 'तिसरं बाळ' म्हटलं आहे. या पोस्टनंतर करिनानं आणखी काही पोस्ट करत आपल्या पुस्तकाची माहिती दिली आहे. करिना कपूरनं २०१६ साली पहिला मुलगा तैमुरला जन्म दिला त्यानंतर २०२१ मध्ये ती पुन्हा एकदा आई झाली आहे. पण चाहत्यांना तिच्या दुसऱ्या मुलाची झलक अद्याप पाहायला मिळालेली नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UE8gMh