Full Width(True/False)

सहा महिन्यांची झाली अनुष्का- विराटची लेक, वामिकाचे Photo Viral

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार यांची मुलगी ६ महिन्यांची झाली आहे. विराट आणि अनुष्कानं याचं सेलिब्रेशन केलं. ज्याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पार्क पिकनिकच्या वेळी मुलीचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. वामिकासोबतचे अनुष्का- विराटचे हे फोटो सध्या खूपच व्हायरल होताना दिसत आहेत. अनुष्का शर्मानं ११ जुलै रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अनुष्का मॅटवर झोपलेली दिसत असून तिच्यासोबत वामिकासुद्धा आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये विराट कोहलीनं वामिकाला कडेवर उचलून घेतलेलं दिसत आहे. ते दोघं एकमेकांसोबत खेळताना दिसत आहे. याशिवाय इतर दोन फोटोंपैकी एका फोटोमध्ये अनुष्काचे आणि वामिकाचे पाय दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये केक दिसत आहे. वामिकाला ६ महिने पूर्ण झाल्यानंतरच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना अनुष्कानं लिहिलं, 'तिचं एक हास्य आमचं पूर्ण जग बदलून टाकू शकतं. आशा करते की, आम्ही तिला नेहमी असंच प्रेम देऊ. जिच्यासोबत तुम्ही आम्हाला पाहत आहात. वामिकाला ६ महिन्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!' अनुष्काच्या या पोस्टवर अद्यापपर्यंत जवळपास ३० लाख लोकांनी लाइक केलं आहे. तसेच अनेक सेलिब्रेटींनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. अनुष्का शर्मानं ११ जानेवरी २०२१ रोजी वामिकाला जन्म दिला होता. आपल्या मुलीच्या जन्मानंतर ट्वीट करताना विराटनं लिहिलं, 'आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, आम्ही एका मुलीचे आई-बाबा झालो आहोत. तुम्हा सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद यासाठी आभार. अनुष्का आणि मुलगी दोघंही ठीक आहेत. आम्हाला हा आनंद अनुभवता येत आहे हे आमचं भाग्यच आहे. आम्ही काही दिवस स्वतःसाठी वेळ हवा आहे आणि मला माहीत आहे तुम्ही सर्व आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल.' दरम्यान विराट आणि अनुष्कानं वामिकाचा चेहरा मात्र अद्याप दाखवलेला नाही. आता शेअर केलेल्या फोटोंमध्येही वामिका पाठमोरी असलेली दिसत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3r4uEKJ