Full Width(True/False)

iPhone 12 सीरीजचा जलवा कायम, १० कोटीहून जास्त आयफोनची विक्री

नवी दिल्लीः Apple iPhone 12 सीरीजला जगभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या माहितीनुसार, लाँचिंगच्या सात महिन्यानंतर आयफोन १२ सीरीजचा ग्लोबल सेल १० कोटीहून जास्त झाला आहे. अॅपलने ही कमाल एप्रिल २०२१ मध्येच केली होती. या सीरिजने हा रेकॉर्ड गेल्या वर्षीच्या iPhone 11 सीरीजच्या तुलनेत दोन महिने आधीच बनवला आहे. वाचाः 5G सपोर्ट आणि OLED डिस्प्लेची मिळाली मदत या जबरदस्त परफॉर्मन्समुळे आयफोन १२ सीरीज आयफोन ६ नंतर सर्वात जास्त वेगाने विकली जाणारी सीरीज बनली आहे. काउंटरपॉइंटच्या म्हणण्यानुसार, आयफोन १२ सीरीजला जगभरात युजर्संनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. कारण, या फोनमध्ये सर्व मॉडल 5G सपोर्ट आणि OLED डिस्प्ले सोबत येतात. वाचाः सर्वात पसंत पडला टॉप अँड व्हेरियंट काउंटरपॉइंट रिसर्चच्या माहितीनुसार, युजर्संना आयफोन १२ सीरीजचा टॉप अँड व्हेरियंट म्हणजेच iPhone 12 Pro Max सर्वात जास्त पसंत पडला आहे. या सीरीजच्या धमाकेदार सेलमध्ये आयफोन १२ प्रो मॅक्सचे एकूण २९ टक्के युनिट विकले गेले आहेत. गेल्या वर्षीच्या आयफोन ११ सीरीजचा टॉप व्हेरियंट iPhone 11 Pro Max च्या सीरीजचे एकूण सेलमध्ये २५ टक्के योगदान होते. वाचाः चार्जर आणि हेडफोनच्या कमीमुळे सुद्धा पडला नाही फरक काउंटरपॉइंटच्या माहितीनुसार, आयफोन १२ सीरीज सोबत चार्जर आणि हेडफोन देण्यात आले नाही. परंतु, याचा काहीही परिणाम फोनच्या विक्रीवर पडला नाही. एप्रिल पर्यंत आयफोन १२ प्रो मॅक्सची ग्लोबल सेल मध्ये अमेरिकी युजर्सचे ४० टक्के योगदान राहिले. डिसेंबर २०२० पासून आयफोन १२ प्रो मॅक्स अमेरिकेत सर्वात जास्त विकला जाणारा हँडसेट बनला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AoR7qm