Full Width(True/False)

मतदान ओळखपत्र बनवायचे आहे ? घरबसल्या असा करा अर्ज

नवी दिल्ली : भारतात दरवर्षी कोठेने कोठे निवडणुका सुरूच असतात. प्रक्रियेत तरुणांचा देखील सहभाग वाढताना दिसत आहे. मतदारांमध्ये तरुणांची संख्या देखील अधिक आहे. अशात जर तुम्ही वयाची १८ वर्ष पूर्ण केली असतील किंवा तुमच्याकडे नसेल तर ते बनवून घ्यायला हवे. तुम्ही कार्यालयात न जाता घरबसल्या बनवू शकता. यासाठीची प्रक्रिया जाणून घेऊया. वाचा : घरबसल्या बनवा वोटर आयडी
  • सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट वर जा.
  • येथे ‘नवीन मतदार रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाइन अर्ज करा’ यावर क्लिक करा.
  • यानंतर समोर आलेला फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.
  • ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची गरज भासेल. तुम्हाला जन्मतारीख, पत्ता इत्यादींच्या पुराव्यासाठी कागदपत्रं अपलोड करावी लागतील.
  • ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
  • यानंतर जो ईमेल आयडी तुम्ही दिला असेल त्यावर मतदान ओळखपत्रासाठी लिंकसोबत एक ईमेल येईल.
  • याद्वारे तुम्ही मतदान ओळखपत्राचे स्टेट्स पाहू शकता व तुम्हाला एक महिन्याच्या आत हे कार्ड मिळेल.
याप्रकारे तुम्ही घरबसल्या मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता व तुम्हाला ऑफिसमध्ये देखील चकरा माराव्या लागणार नाहीत. वाचा : वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hb51of