Full Width(True/False)

Mimi Trailer: क्रिती सेनॉनचा 'सरोगसी मदर' होण्याचा निर्णय चुकला?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'मिमी'बाबत प्रेक्षकांना बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटाची मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चा झाली होती. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लाटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरची सध्या चर्चा सुरू आहे. हा चित्रपट मराठीतील 'मला आई व्हायचंय' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे या ट्रेलरची सुरुवात पंकज त्रिपाठी, आणि यांच्यासोबत एका कारमध्ये होते. आई आणि मुलाच्या नात्याबद्दल बोलताना दिसतात. या चित्रपटात क्रिती सेनॉन एका डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. एका परदेशी दाम्पत्याला क्रिती आवडते आणि ते तिला सरोगेट मदर होण्यासाठी विनंती करतात. ज्याच्या बदल्यात ते तिला २० लाख देण्यास तयार होतात. क्रिती सुरुवातीला नाही म्हणते पण नंतर तयार होते. मस्ती मस्करीच्या नंतर ट्वीस्ट तेव्हा येतो जेव्हा अखेर ते दाम्पत्य मुल नको असल्याचं सांगतात. कृती सेननं तिच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर करताना दिसताना लिहिलं, 'हा अनपेक्षित प्रवास वगळता मिमीला सर्व गोष्टींच्या अपेक्षा आहेत. ही माझी मिमी, तुमच्यासाठी आपल्या कुटुंबासोबत पाहा याची झलक.' क्रिती सेनॉनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक, मनोज पाहवा, सई ताम्हणकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटासाठी क्रितीनं १५ किलो वजन वाढवलं होतं. अर्थात यासाठी तिला बरीच मेहनत घ्यावी लागली होती. 'मिमी' या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या ३० जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि जियो सिनेमावर रिलीज होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yXc5Lr